शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील अ‍ॅट्रॉसिटी, खंडणीचा गुन्हा खोटा

By admin | Updated: March 4, 2016 00:07 IST

हदगाव : येथील गटशिक्षणाधिकारी बी़वाय़ येरपुलवार यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी व खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

हदगाव : येथील गटशिक्षणाधिकारी बी़वाय़ येरपुलवार यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी व खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.तालुक्यातील उमरी (दर्या) येथे कार्यरत गुणवंत काळे या शिक्षकाला २०१०-२०११ मध्ये खोली बांधकामासाठी ७ लाख ४४ हजार रुपये मिळाले होते़ परंतु ज्या कामासाठी पैसे मिळाले ते काम अपूर्ण असून रक्कम मात्र पूर्ण उचल केली होती़ अर्धवट कामे असलेल्या सर्वच शिक्षकांना शिक्षण विभाग नांदेड यांनी ७ सप्टेंबर २०१५ रोजी नोटीस जारी केल्या होत्या़ कामे पूर्ण केल्यामुळे या शिक्षकांची पगारही बंद करण्यात आली होती़ही नोटीस मला जाणीवपूर्वक दिली व माझी पगारही बंद का केली म्हणून हे शिक्षक गटशिक्षणाधिकारी बी.वाय. येरपूलवार यांच्याकडे चौकशीला गेले होते़ त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी येरपूलवार यांनी जातीवाचा शिवीगाळ करुन ५० हजार रुपये खंडणी मागितली, असा आरोप या शिक्षकाने केला व तब्बल २० दिवसानंतर २९ सप्टेंबर २०१५ रोजी हदगाव ठाण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी व खंडणीचा गुन्हा नोंदविला. नांदेडच्या सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर येरपूलवार यांनी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात धाव घेतली व अटकपूर्व जामीन मिळविला होता़ त्यानंतर पाच महिने सुनावणी झाली़ या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील माझा विश्वास वाढला. तसा प्रकार घडलाच नव्हता तरीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. यामुळे मला मानसिक त्रास झाला़ समाजामध्ये माझी बदनामीही झाल्याची भावना येरपूलवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. (वार्ताहर)निकालात खंडपीठाने म्हटले की, शिक्षण विभाग (प्राथमिक) नांदेड यांनी नोटीस दिली होती़ त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांचा संबंध येत नाही़ जे दोन साक्षीदार फिर्यादीने कोर्टापुढे उभे केले त्याचा या विभागाशी काहीही संबंध नाही़ हे प्रकरण कार्यालयात झाल्यामुळे तेथील कर्मचारीच साक्षीदार होऊ शकतात़ पण कर्मचारी साक्षीदार नव्हते़ ज्या कारणासाठी संबंधित शिक्षकाला नोटीस दिली ते कारणही सत्य होते व इतर शिक्षकाच्याही पगारी बंद करण्यात आल्या होत्या व काम पूर्ण होताच पुन्हा सुरू करण्यात आल्या़ त्यामुळे खंडणी मागण्याचा विषयही सत्य वाटत नाही़यामुळे बी़आय़ येरपुलवार यांना निर्दोष करार देण्यात आला असून हा गुन्हा जाणीवपूर्वक उर्वरित काम करायला लावू नये व दबाव तंत्राचा वापर करण्याचा हा प्रकार आहे.