शरीर सुखाची मागणी करीत महिलेला बेदम मारहाण

By राम शिनगारे | Updated: April 23, 2023 19:49 IST2023-04-23T19:48:55+5:302023-04-23T19:49:04+5:30

राजकीय पदाधिकाऱ्याचे कृत्य : छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

A woman was brutally beaten for demanding pleasure | शरीर सुखाची मागणी करीत महिलेला बेदम मारहाण

शरीर सुखाची मागणी करीत महिलेला बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगर : माझ्यासोबतच शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला चाकूने भोसकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चारचाकी गाडीतच बेदम मारहाण झाल्याचा प्रकार २२ एप्रिल रोजी सायंकाळी लक्ष्मी कॉलनी येथील बारापुल्ला गेटजवळ घडला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात राजकीय नेता जयकिशन कांबळे (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकिशन कांबळे याने एका महिलेस फोन करून बोलावून घेतले. महिला तिच्या मामाच्या मुलीसोबत कांबळे यास भेटण्यास गेली. तेव्हा त्याने कारमध्ये बसण्यास सांगितले. कारमध्ये त्याने माझ्यासोबतच संबंध ठेव, माझ्यासोबत चल, तु मला पाहिजे आहेस. माझ्यासोबत आली नाहीस तर तुला भोसकून टाकीन अशी धमकी दिली. गाडीतुनच बसूनच फिर्यादीला डीमार्टमध्ये घेऊन गेला.

फिर्यादी आतमध्ये गेल्यानंतर तीला बाहेर येण्यास उशीर झाला. फिर्यादी डीमार्टमधून उशीरा बाहेर आल्यामुळे कांबळे याने तीला शिविगाळ करीत हातचापटाने बेदम मारहाण केली. तया तिच्या दोन्ही डोळ्यालाही मार लागला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास छावणी पोलिस करीत असल्याची माहिती निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली.
आरोपीवर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा

आरोपी जयकिशन कांबळे हा एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता. त्याच्या विरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात अटक झाल्यानंतर कांबळे हा जामिनावर सुटलेला आहे. बलात्काराचा गुन्हा नोंदविताच संबंधित पक्षाने हकालपट्टी करणारे पत्रही काढले होते.

Web Title: A woman was brutally beaten for demanding pleasure