शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
4
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
5
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
6
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
7
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
8
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
9
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
10
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
11
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
12
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
13
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
14
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
15
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
16
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
17
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
18
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
20
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालत २० फूट फरफटले, प्रवासीही पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:25 IST

पोलिस अंमलदार गंभीर जखमी; छत्रपती संभाजीनगरमधील महावीर चौकातील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर : महावीर चौकात वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या अंमलदारावर एका बेजबाबदार रिक्षाचालकाने रिक्षा घातली. पोलिस अंमलदार तुकाराम टाकसाळे हे या धडकेत खाली कोसळले. चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अंमलदार टाकसाळे रिक्षाखाली अडकल्याचे लक्षात येऊनही त्यांना २० फुटांपर्यंत फरफटत नेले. ही घटना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. तुकाराम टाकसाळे सध्या सिग्मा रुग्णालयात आयसीयुत दाखल आहेत. रिक्षाचालक आरोपीच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

युसूफ मोहंमद अली अन्सारी (२७, रा. मोमीनपुरा मशिदीजवळ, दौलताबाद) असे रिक्षा चालकाचे नाव असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली. शहरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू होती. महावीर चौकातही चार रस्त्यांना चार पोलिस अंमलदार उभे करून छावणी वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई करीत होते.

विनागणवेश असल्याने थांबविण्याचा केला प्रयत्नमहावीर चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे असलेले अंमलदार तुकाराम टाकसाळे यांना एक चालक विनागणवेश रिक्षा (एमएच २०-ईके ४६३२) चालवित असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच त्याला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र, मुजोर रिक्षाचालक युसूफ थांबला तर नाहीच, उलट सुसाट वेगात टाकसाळे यांना रिक्षाची धडक दिली. यात त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या असून, हात-पाय आणि बरगडीचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवासी पडला, दुचाकीस्वाराला उडविलेपोलिसाला धडक देऊन फरफटत नेल्यानंतर रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी हा काही थांबला नाही. रिक्षा सुसाट नेत पसार झाला. ही घटना घडल्यानंतर उपस्थित पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला असतानाच त्याने एका दुचाकीस्वारालाही उडविले. वेगात वळण घेत असल्याने त्याच्या रिक्षातील तीन प्रवाशांपैकी एक प्रवासीही रस्त्यावर कोसळला. तरीही तो थांबला नाही. यादरम्यान, पोलिसांनी चालकाचा चेहरा आणि रिक्षाचा क्रमांक तेवढा टिपला.

यापूर्वी महिलेची पर्स हिसकावलीदरम्यान, दि. ११ ऑगस्ट रोजी याच रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशनवर एका महिलेची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यास उपस्थित पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांसोबत हुज्जत घालत मारहाण केली होती. या प्रकरणातही वेदांतनगर पोलिस ठाण्यातच युसूफ विरोधात गुन्हा नोंद आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad: Reckless Rickshaw Driver Drags Cop, Passenger Falls Out

Web Summary : In Aurangabad, a reckless rickshaw driver ran over a traffic cop, dragging him 20 feet. The officer is hospitalized. The driver, Yusuf Ansari, also hit a motorcyclist and caused a passenger to fall from his rickshaw before being apprehended. He has previous charges for assaulting police.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtraffic policeवाहतूक पोलीस