शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरजवळ गोमांसाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड, गोरक्षकांचा रस्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:02 IST

इटावा-जोगेश्वरी मुख्य रस्त्यावर गोरक्षकांनी रस्तारोको केल्याने वाळूज उद्योगनगरी ठप्प

वाळूज महानगर : इटावा-जोगेश्वरी मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. गोमांसाने भरलेली रिक्षा ( एमएच २० ईएफ ७०२३)  येथून जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली. त्यांनी तत्काळ रिक्षा अडवून तपासणी केली. रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळताच वातावरण तणावपूर्ण झाले. संतप्त गोरक्षकांनी रिक्षेची तोडफोड केली आणि घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन सुरू केले. 

गोरक्षकांनी स्पष्टपणे मागणी केली की, “ज्या ठिकाणी गोहत्याचे प्रकार चालतात, त्या ठिकाणांवर कठोर छापे टाकून कारवाई करावी. अवैध गोमांसाची वाहतूक उद्योगनगरी परिसरात वाढली आहे; यावर पोलिसांनी कडक पावले उचलावी.” घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र गोरक्षक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने चर्चा निष्फळ ठरली. या रस्ता रोकोमुळे इटावा-जोगेश्वरी मार्ग तसेच उद्योगनगरीतील मुख्य चौकांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. उद्योगनगरीत जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिक व कामगार त्रस्त झाले. काही वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 

तीन तासांनी रस्तारोको मागेदरम्यान, रिक्षा चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, “हे मांस आंबेलोहळ येथून आणले असून ते जोगेश्वरी येथे नेण्यासाठी निघालो होतो.” रिक्षेतून एक महिला आणि एक पुरुष यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर रस्ता रोको मागे घेण्यात आल्याने वाहतुक सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cow vigilantes vandalize beef-laden auto, block road near Chhatrapati Sambhajinagar.

Web Summary : Cow vigilantes near Chhatrapati Sambhajinagar intercepted an auto carrying beef, vandalized it, and staged a road blockade. They demanded action against illegal slaughterhouses. Police intervened, arresting two and promising action, leading to the end of the protest and traffic flow returning to normal after three hours.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर