घाटी रुग्णालयात दोन गटांत हाणामारी, निवासी महिला डॉक्टराच्या डोक्यात लागला रॉड!

By संतोष हिरेमठ | Updated: January 11, 2024 22:31 IST2024-01-11T22:29:22+5:302024-01-11T22:31:16+5:30

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटांची आपसात मारहाण झाली. यात एका तरुणाच्या हातातील राॅडचा वार महिला निवासी ...

A resident lady doctor was hit in the head by a rod, in ghati hospital | घाटी रुग्णालयात दोन गटांत हाणामारी, निवासी महिला डॉक्टराच्या डोक्यात लागला रॉड!

घाटी रुग्णालयात दोन गटांत हाणामारी, निवासी महिला डॉक्टराच्या डोक्यात लागला रॉड!

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटांची आपसात मारहाण झाली. यात एका तरुणाच्या हातातील राॅडचा वार महिला निवासी डाॅक्टरच्या डोक्यात लागला. त्यात महिला डाॅक्टरला जबर मार लागला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतल्यानंतर निवासी डाॅक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला.

दोन गटात मारहाणीची घटना झाली होती. यातील दोन्ही गटातील जखमी उपचारासाठी घाटीतील अपघात विभागात दाखल झाले होते. जखमींवर उपचार सुरु असतानाच पुन्हा मारहाण सुरु झाली.एका तरुणाने राॅडने मारहाण  केली. तेव्हा त्याच्या हातातील राॅड  महिला निवासी डाॅक्टरच्या डोक्याला लागला.  या घटनेनंतर अपघात विभागातील निवासी डाॅक्टर एकत्र आले आणि कामबंदचा पवित्रा घेतला.

याविषयी माहिती मिळताच अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे,  यांनी घा निवासी डाॅक्टरांशी संवाद साधला.  याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. त्यानंतर निवासी डाॅक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत झाली.

Web Title: A resident lady doctor was hit in the head by a rod, in ghati hospital