पत्नी घरकामानिमित्त बाहेर जाताच गळफास घेऊन मजुराची आत्महत्या
By राम शिनगारे | Updated: March 15, 2023 18:42 IST2023-03-15T18:41:57+5:302023-03-15T18:42:35+5:30
पडेगाव परिसरातील सुंदरनगर येथील घटना

पत्नी घरकामानिमित्त बाहेर जाताच गळफास घेऊन मजुराची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : पडेगाव परिसरातील सुंदरनगर भागात एका ३० वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नितीन कडूबा घागरे असे या मृत मजुराचे नाव आहे.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन घागरे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून त्याची पत्नी घरकाम करते. बुधवारी पत्नी घरकामासाठी गेली असता, त्याने घरातील पत्र्याच्या आडव्या लोखंडी पाइपला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. शेजारील राहणाऱ्या मुलांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून नितीनला बाहेर काढले. शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने नितीनला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.