चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फाेडली

By राम शिनगारे | Updated: April 9, 2023 17:49 IST2023-04-09T17:49:39+5:302023-04-09T17:49:45+5:30

या प्रकरणांमध्ये संबंधित ठाण्यात शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले.

A flurry of thieves; Three shops were torn down | चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फाेडली

चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुकाने फाेडली

छत्रपती संभाजीनगर : शहरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या विविध भागात तीन दुकाने फोडून ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणांमध्ये संबंधित ठाण्यात शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले.

टिळकपथ रोडवरील राजधानी हॅण्डलूमच्या शेजारी फिरोज खान इब्राहीम खान (रा.बुढ्ढीलाईन,कबाडीपुरा) यांचे असलेले बॅगशॉपी नावाचे दुकान फोडून चोरट्याने ५० हजार रूपये किंमतीच्या विविध कंपन्याच्या बॅग चोरून नेल्या. ही घटना ६ एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रवि सुरेद्र गुप्ता (रा.कासलीवाल मार्बल, बीड बायपास रोड) यांच्या मालकीचे किराणा चावडी परिसरातील अग्रवाल केबल्स नावाचे दुकान १ एप्रिलच्या रात्री फोडून चोरट्यांनी दुकानातून २० हजार रूपये चोरून नेले.

तसेच अब्दुल वहाब नसीर शेख (रा.शेंदुरवादा, ता.गंगापुर) यांचे सावखेडा फाटा येथे असलेले फॅब्रिकेशनचे दुकान ६ एप्रिलच्या रात्री फोडून चोरट्यांनी दुकानातून १२ हजार रूपये किंमतीचे वेल्डींगचे वायर व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी क्रांतीचौक, सिटीचौक आणि वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले.

Web Title: A flurry of thieves; Three shops were torn down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.