​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले!

By सुमित डोळे | Updated: September 22, 2025 16:56 IST2025-09-22T16:55:17+5:302025-09-22T16:56:15+5:30

रविवारी मध्यरात्री १.३० वाजता बारबाहेर घडला प्रकार, पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना

​​​​​​​A dispute broke out over a pea in front of a car, Chhatrapati Sambhajinagar was shaken by direct firing on a young man! | ​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले!

​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले!

छत्रपती संभाजीनगर : बारमध्ये दारु पिऊन बाहेर आल्यानंतर कारसमोर एकाने लघुशंका करण्यावरुन ग्राहकांच्या दोन गटात वाद पेटले. मात्र, हे वाद टोकाला जात कारचालकाचा दुचाकीवर पाठलाग करत थेट गोळी झाडून हत्येया प्रयत्न करण्यात आला. रविवारी मध्यरात्री १.३० वाजता चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

जमिन व्यावसायिक तौफिक शौफिक पठाण् (३०, रा. कमळापुर) हे २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मित्र निसार जबार सोबत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पाम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्री १२.३० वाजता जेवण करुन ते बाहेर पडले. यावेळी पार्किंगध्ये गणेश औताडे नामक तरुण दारु पिऊन बाहेर आला. त्याने तौफिक यांच्या कारसमोर लघुशंका केली. यातून त्यांच्यात वाद झाले. शिविगाळ आरडाओरड होत धक्काबुक्की झाली. मात्र, इतरांनी मद्यस्थी करत प्रकरण मिटवले. साधारण १ वाजता तौफिक मित्रासह निघाले. कारने ते कलाग्राम मार्गे प्रोझोन मॉलच्या दिशेने जात असताना निसार यांनी लघुशंकेसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर कार थांबवली. तेवढ्यात एपीआय कॉर्नरच्या दिशेने त्रिपलसीट मोपेडस्वार आले. दुरवर गाडी थांबवत त्यातील एकाने पळत जात पिस्तूल काढून थेट तौफिक यंाच्या दिशेने गौळी झाडली. तेवढ्यात ते मागे सरकले. मात्र, निसार यांच्या कानाजवळून गोळी जात दरवाजाच्या बंद काचेवर लागली. 

पहिले वाळूज पोलिस ठाण्यात गेले
या घटनेमुळे घाबरलेले पहिले त्यांच्या परिसरात जात एमआयडीसी वाळूज पाेलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांना हद्द सांगून एमआयडीसी सिडको पाेलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. परत येईपर्यंत निसार यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, एमआयडी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: ​​​​​​​A dispute broke out over a pea in front of a car, Chhatrapati Sambhajinagar was shaken by direct firing on a young man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.