शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरात आला, ज्याने घरी सोडले त्यालाच मारहाण करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:48 IST

मुकुंदवाडीत लुटमारीचा चौथा दिवस : दोन वर्षांसाठी हद्दपार असताना आरोपी हद्दीत आला

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत लुटमार, प्राणघातक हल्ल्यांच्या घटना सातत्याने सुरू असून, पुन्हा एकदा रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराने शहरात प्रवेश केला. सोबतच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली.

जितेंद्र श्रीमंत दीक्षित (रा. प्रकाशनगर) असे आरोपीचे नाव आहे. जितेंद्र पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सततच्या गुन्ह्यांमुळे त्याला दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी तो शहरात परतला. योगेश पांडुरंग बोरुडे (२५, रा. दुधड)या तरुणाला भेटला. रात्री जितेंद्रने योगेशला घरी सोडण्याची विनंती केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास योगेशने त्याला प्रकाशनगरमध्ये सोडले. मात्र, तेवढ्यात जितेंद्रने त्याला मारहाण केली. त्याच्याकडील १५,५०० रुपये हिसकावून घेतले. मोबाइल देखील हिसकावला. पुन्हा मारहाण करून पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. २५ नोव्हेंबर रोजी योगेशने मुकुंदवाडी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर दुपारी जितेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर अधिक तपास करत आहेत.

वेदांतनगरमध्ये अज्ञाताचा तरुणावर हल्लाशहरात सातत्याने शस्त्रे उपसली जाऊन प्राणघातक हल्ले, लुटमारीच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाळूज, एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर, मुकुंदवाडीनंतर आता वेदांतनगर परिसरात एका अज्ञाताने पैशांसाठी तरुणावर हल्ला केला. रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीत राहणारे सचिन मगरे (३३) हे २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजता घरी जात असताना एका अज्ञाताने त्यांना अडवले. नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली. मगरेंनी त्याला नकार देताच त्याने हल्ला चढवला. डोक्यात वार करून जखमी केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Deported Criminal Returns, Assaults and Robs the Person Who Helped Him.

Web Summary : A deported criminal, Jitendra Dixit, returned to Chhatrapati Sambhajinagar and assaulted Yogesh Borude, robbing him of ₹15,500 and his mobile phone. Separately, in Vedantnagar, an unknown assailant attacked Sachin Magare demanding money, injuring him. Police are investigating both incidents.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर