मराठवाड्यात शनिवारी ९३६ जणांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 14:59 IST2020-10-04T14:59:30+5:302020-10-04T14:59:57+5:30
मराठवाड्यात शनिवारी ९३६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात शनिवारी ९३६ जणांना कोरोना
औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी ९३६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १८३ रूग्ण सापडले असून ६ जणांचा मृत्यू झाला. यासह आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४, १९३ झाली असून आतापर्यंत २८, ६७८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण ९५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
लातूर १७३, बीड १४७, नांदेड- १४०, उस्मानाबाद १०७, परभणी १०३, जालना ७५ तर हिंगोली जिल्ह्यात ८ जण कोरोनाबाधित आढळून आले.