शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

९३४ अतिरिक्त शिक्षकांचे करायचे काय ?

By admin | Updated: July 24, 2015 00:49 IST

बीड : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात धडकलेल्या शिक्षकांच्या लोंढ्यांमुळे एक ना अनेक गुंते निर्माण केले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा आकडा

बीड : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात धडकलेल्या शिक्षकांच्या लोंढ्यांमुळे एक ना अनेक गुंते निर्माण केले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा आकडा फुगल्याने समायोजनासह वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे नेमके करायचे काय? असा प्रश्न जिल्हा परिषदेसमोर आहे. सीईओ नामदेव ननावरे यांनी यासंदर्भात आता प्रधान सचिवांकडे मार्गदर्शन मागविले आहे.जिल्हा परिषदेत ८ हजार ७६४ शिक्षकांची पायाभूत पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात ९ हजार ६९८ शिक्षक कार्यरत आहेत. मंजूर पदांपेक्षा तब्बल ९३४ पदे अतिरिक्त झाले आहेत. २३ एप्रिल २०१५ रोजी शासनाने वस्तीशाळा शिक्षकांना कार्यमुक्त करावे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना मूळ ठिकाणी पाठविण्यासाठी कार्यमुक्त करावे असे आदेश दिले होते;परंतु काही शिक्षकांनी आक्षेप नोंदवत खंडपठात आव्हान दिले. खंडपीठाने ज्या जिल्ह्यातून शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आले आहेत, तेथे जागा रिक्त आहेत का? याची माहिती घेण्याचे आदेश सीईओंना दिले होते. तसेच वस्तीशाळा शिक्षकांना अंतिम नोटीस द्यावी, त्यांना पुरेशी संधी देऊन म्हणणे नोंदवावे असेही आदेश होते. आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बीडमध्ये ज्येष्ठता यादीत शेवटी आहेत. ज्येष्ठतेने शेवटच्या क्रमांकावर असतील त्यांना प्रथम आंतरजिल्हा बदलीने मूळ ठिकाणी पाठवावे लागेल;परंतु आपसात बदली, पती- पत्नी एकत्रीकरण, विधवा, परितक्त्या, अपंग शिक्षकांबाबत काय निर्णय घ्यायचा? याचा पेच निर्माण झाला आहे. मूळ जिल्ह्यात शिक्षकांची जागा रिक्त नसेल, संवर्गातील जागा जागा रिक्त नसतील तर काय करायचे? असा प्रश्नही जिल्हा परिषद प्रशासनापुढे आहे. त्यामुळे यांसदर्भाने मार्गदर्शन मागविले आहे.वस्तीशाळा शिक्षकांच्या बाबतीतही तिढा आहे. ३०२, ३४७ व १४७ इतक्या स्वयंसेवकांना टप्प्याटप्प्याने निमशिक्षक म्हणून आदेश दिले होते. ३४७ निमशिक्षकांतून शिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना सेवामुक्तीची नोटीस बजावून त्यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. मात्र, काही शिक्षकांनी अटींची पूर्तता केली असल्यास त्यांना शिक्षक पदावर काम करण्याची संधी द्यावी व जे अपात्र आहेत त्यांना नोटीस देऊन सेवासमाप्ती करण्यासंदर्भातही मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. १४७ वस्तीशाळा शिक्षकांना निमशिक्षक पदावर नेमणूका न देता थेट शिक्षक पदावर नेमणूका दिल्या, या सर्वांना कमी करावे व पात्र स्वयंसेवकांची यादी करुन जसजसे शिक्षकांची पदे रिक्त होतील त्याप्रमाणे नियुक्त्या देण्याच्या अनुषंगानेही शासनाचे मत मागविले आहे. (प्रतिनिधी)बीडमध्ये आंतरजिल्हा बदलीने येण्यासाठी शिक्षकांना ‘लक्ष्मीदर्शन’ दाखवावे लागलेले आहे. दोन ते तीन लाखांपर्यंत भाव ठरलेले होते. त्यामुळे आता पुन्हा मूळ ठिकाणी जाण्यास शिक्षक उदासीन आहेत. काही शिक्षकांनी पालकमंत्र्यांसह विविध नेत्यांना बीडमध्येच राहण्यासाठी साकडे घातले आहे. स्थायीच्या बैठकीतही अतिरिक्त शिक्षकांना बाहेर न पाठविण्याचा तसेच वस्तीशाळा शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा ठराव झालेला आहे. लोकप्रतिनिधींकडून दिलासा मिळत असताना प्रशासनाकडून मात्र नोटिसा पाठविण्याच्या हालचाली आहेत. १४७ वस्तीशाळा शिक्षकांना नोटीस गेलेली आहे. त्यामुळे शिक्षक धास्तावलेत.