शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

८८५ अंगणवाड्या भाड्याच्याच इमारतीत

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

बाळासाहेब जाधव , लातूर ३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात २४०८ अंगणवाड्या कार्यरत आहेत.

बाळासाहेब जाधव , लातूर३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात २४०८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी १५२३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. तर उर्वरित ८८५ अंगणवाड्यांना मात्र स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे बालगोपाळांची गैरसोय होते. उन्हाळा व पावसाळ्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे या अंगणवाड्यांवर नियंत्रण आहे. दरवर्षी अंगणवाडी बांधकामासाठी ५ कोटींचा निधी येतो. अंगणवाड्यांतील अन्य उपक्रमांचा काही निधी व ५ कोटींचा निधी याचा ताळमेळ घालून वर्षाला किमान १५० अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येते. त्यानुसार १५२३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत झाली आहे. मात्र आणखीन ८८५ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा आहे. सध्या या अंगणवाड्या ग्रा.पं.च्या सार्वजनिक जागेत किंवा भाड्याच्या जागेत भरविल्या जातात. इथे मुलांना पुरविण्यात येणारा सकस आहार ठेवायला जागाही नाही. शैक्षणिक साहित्य ठेवण्याचीही अडचण, अशा विविध अडचणींचा सामना या अंगणवाड्यांना करावा लागत आहे. निधी मिळाल्यास बांधकाम़़़जिल्ह्यातील २ हजार ४०८ अंगणवाड्यापैकी चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी १५२३ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात आले़ परंतु, बजेटअभावी उर्वरित विद्यार्थ्यांना खाजगी इमारती, समाज मंदिर व इतर शासकीय कार्यालयात आधार घ्यावा लागत आहे़ दरवर्षी १२५ अंगणवाड्याच्या बांधकामाची मान्यता मिळत असल्याने उर्वरित इमारतींचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण केले जाईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कांगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़