शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

मराठवाड्यातील ८७९ शेत पाणंद रस्ते रद्द, शेतकऱ्यांच्या अडचणी जैसे थे!

By विकास राऊत | Updated: November 30, 2023 19:08 IST

मंजूर ११ हजार ९४४ पैकी पाच हजार २८१ रस्त्यांची कामे सुरू

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना पायी चालणेदेखील अवघड होत आहे. रस्त्यांअभावी दळणवळणाची सोय नसल्यामुळे विविध पिके घेण्याचाही शेतकरी विचार करीत नाहीत. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेत राज्यातील गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्याची योजना सरकारने आणली; परंतु त्या योजनेला मराठवाड्यात घरघर लागली आहे.

विभागात रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्ष २०२२-२३ मधील सुमारे ८७९ मातोश्री शेत पाणंद रस्ते रद्द करण्यात आले आहेत, तर मंजूर रस्त्यांच्या कामांना अजूनही गती मिळालेली नाही. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग स्तरावरील हे रस्ते असून १२ हजार ६७७ पैकी ११ हजार ९४४ रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील ग्रामपंचायत स्तरावर चार हजार ८२६, तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या ४५५ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित कामांना अद्याप मुहूर्त लागलेला नाही. चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांचा कालावधी संपला आहे. मार्चअखेरपर्यंत ही कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.

शासनाने मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाेन हजार ६२५, जालना १,९८४, बीड २,९९३, परभणी १,५७८, हिंगोली ४५६, नांदेड १,१६०, लातूर १,२१३, धाराशिव ६६८ अशा १२ हजार ६७७ रस्त्यांना मंजुरी दिली. त्यातील ८७९ रस्ते रद्द करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात विभागीय प्रशासनाने पाणंद रस्त्यांबाबत आढावा घेतला.

कोणत्या जिल्ह्यातील किती रस्ते रद्द? भाजपचे खासदार असलेल्या जालना जिल्ह्यातील १५२, बीडमधील २१, नांदेडमधील ११३, लातूर जिल्ह्यातील १७० रस्ते रद्द करण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार असलेल्या परभणी जिल्ह्यातील १३२, धाराशिवमधील ४९ रस्ते रद्द करण्यात आले आहेत. एमआयएमचे खासदार असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १९१ रस्ते, तर शिंदे गटाचे खासदार असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ५१ रस्ते रद्द केले आहेत.

कशासाठी आणली योजना?सर्वत्र शेत पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असून रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना तयार पीक शेतातून बाहेर आणणे, तसेच साठवणे व बाजारात विक्रीसाठी नेणे अवघड जाते. रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांवर भर द्यावा लागतो. ग्रामीण भागातही मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना आणली; परंतु ही योजनाही प्रभावी राबविली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यास तयार नाहीत.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र