शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

छाप्यात ८,४०० लिटर रॉकेल केले जप्त

By admin | Updated: August 13, 2015 00:22 IST

नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते.

नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारातील एका शेडमध्ये रेशनचे धान्य आणि रॉकेलचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी सदरील शेडवर छापा मारला असता दोनशे लिटरचे तब्बल ४२ बॅरल रॉकेल (८४०० लिटर), ५० किलो वजानाचे ६० कट्टे गहू आणि ५२ कट्टे तांदूळ आढळून आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मालाचे नमुने, वजन-मापे घेत होते. या प्रकरणी तुळजापूर ठाण्याचे सपोनि किरण दामोदर दांडगे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रज्जाक कचरू पठाण (रा. काटगाव) व जावेद महेबूब नदाफ (रा. केशेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उपरोक्त दोघांनाही तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि फुलचंद मेंगडे हे करीत आहेत. (वार्ताहर) शासनाच्या निकषानुसार प्रति कार्ड दोन लिटर या प्रमाणे पोलिसांनी जप्त केलेले ८४०० लिटर रॉकेल हे किमान ४ हजार २०० लाभार्थ्यांचे आहे. ३००० किलो गहू हे एक हजार युनिटधारकांचे आहे. तर २९०० किलो तांदूळ हा १ हजार ३०० युनिटधारकांचा आहे. त्यामुळे उपरोक्त साठा करून ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून जोर धरू लागली आहे.