शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

८४ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात आज दिवाळी साजरी झाली. मुंबईच्या ‘आलंबिक टचिंग’ कंपनीने गुरुवारी परिसर मुलाखतीद्वारे तब्बल ३७

औरंगाबाद : विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात आज दिवाळी साजरी झाली. मुंबईच्या ‘आलंबिक टचिंग’ कंपनीने गुरुवारी परिसर मुलाखतीद्वारे तब्बल ३७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली. यंदा द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ८४ विद्यार्थ्यांचे परिसर मुलाखतीच्या माध्यमातून भाग्य उजळले, हे विशेष!यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यंदा द्वितीय वर्षामध्ये ११५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डिसेंबर महिन्यात या विद्यार्थ्यांची तृतीय सत्राची परीक्षा आहे. त्यानंतर चौथ्या व शेवटच्या सत्राची परीक्षा होईल. तत्पूर्वीच विविध १२ कंपन्यांनी व्यवस्थापनशास्त्र विभागात येऊन परिसर मुलाखती घेतल्या. त्यामध्ये यापूर्वी ४७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. आज गुरुवारी सकाळी मुंबई येथील ‘आलंबिक टचिंग’ या कंपनीचे व्यवस्थापक चित्रा शेट्टी, अंकिता मिश्रा, सचिन थोरात व रवींद्र ढाकोरकर आदींनी परिसर मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीमध्ये द्वितीय वर्षाच्या ३७ विद्यार्थ्यांची चांगल्या हुद्द्यावर व चांगल्या पगारावर निवड करण्यात आली. शिक्षण सुरू असतानाच नोकरी मिळणे, हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो. आजच्या परिसर मुलाखतीद्वारे एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल विभागाचे विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याची भावना प्लेसमेंट आॅफिसर डॉ. फारुख खान यांनी सांगितले.४विविध नामांकित कंपन्यांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे चौथे सत्र हे प्रोजेक्ट रिपोर्ट सादरीकरणाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये तीन महिने काम करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. ४त्याअगोदरच विभागातील तब्बल ८४ विद्यार्थ्यांचे भाग्य उजळले. हे विद्यार्थी कंपन्यांमध्ये नोकरी करीत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतील, असे डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.