शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

८२ छावण्यांची झाडाझडती

By admin | Updated: December 23, 2015 23:57 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड खैरात वाटल्याप्रमाणे जिल्हयात एकाच गावात दोन-दोन छावण्यांना मंजुरी आहे. छावण्या मिळवून मालामाल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांचे मनसुभे

व्यंकटेश वैष्णव , बीडखैरात वाटल्याप्रमाणे जिल्हयात एकाच गावात दोन-दोन छावण्यांना मंजुरी आहे. छावण्या मिळवून मालामाल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांचे मनसुभे उधळण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवारी चाळीस पथकांकडून ८२ वर छावण्यांची महसूल विभागाच्या पथकांकडून झाडाझडती करण्यात आली. निकष न पाळणाऱ्या छावण्या कारवाईच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्हयात एकूण १०२ छावण्यांना मंजूरी आहे. पैकी ८२ सुरू आहेत. सातत्याने तीन वर्षापासून जिल्हयात दुष्काळ आहे. अत्यल्प पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या चाऱ्याची टंचाई आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र एक ते दीड किलो मीटर अंतरावरच छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे.मंगळवारी केलेल्या तपासणीमध्ये बहुतांश छावण्यांनी शासनाचे निकष पायदळी तुडविल्याचे आढळून आले आहे.खापरपांगरी, उखंडाछावणीला पुन: परवानगीबीड तालुक्यातील खापरपांगरी, शिरूर कासार तालुक्यातील उखंडा चकला येथील छावण्यांमध्ये त्रुटी आढळल्याचा ठपका ठेवत त्यांचा परवाना रद्द केला होता. दोन्ही संस्थांनी अपील केल्यानंतर परवाना नियमित करण्यात आला आहे. दरम्यान, खापरपांगरी येथील छावण्यामध्ये १२०० हून अधिक तर उखंडा छावणीत ८०० हून अधिक गुरे आहेत. परवाना नसतानाही या गुरांचा १२ दिवस संस्थांनी सांभाळ केला आहे.खापरपांगरी येथील छावणीमध्ये परराज्यातील गुरे असल्याचा ठपका तपासणी अधिकाऱ्यांनी ठेवला होता. प्रत्यक्षात ही गुरे स्थानिक शेतकऱ्यांचीच असल्याचे छावणी संचालक अशोक हिंगे म्हणाले. गुरांची नोंदणी करताना शेतकऱ्यांचा सातबारा, आधारकार्ड पाहिले जाते. त्यामुळे चुकीचे निकष लावून परवाना रद्द केला होता, असा दावाही हिंगे यांनी केला.मंजुरी नागझरीची, छावणी बेलखंडीतबेलखंडी येथील केशर दूध उत्पादक सहकारी संस्थेला नागझरी येथे छावणी मंजूर आहे. प्रत्यक्षात बेलखंडी येथे छावणी सुरू आहे. याबाबत बुधवारी सरपंच वैशाली पाव्हणे, उपसरपंच मदूबाई माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.