शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात गावांतील ८ हजार एकर जमीन होणार संपादित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:34 IST

शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर: एमआयटीएल ( ऑरिक सिटी) अंतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर (डीएमआयसी)च्या बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील औद्योगिक जमीन संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर बिडकीन डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी, लगतच्या ७ गावांतील ८ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती. यात शेंद्र्यांमध्ये २ हजार एकर तर बिडकीनसह लगतच्या गावांतील ८ हजार एकर जमिनीचा समावेश होता. ऑरिक सिटीने पहिल्या टप्प्यात शेंद्रा औद्योगिक झोनमधील भूखंड विक्री केले. तेथे आता केवळ १०० एकरचा एकमेव भूखंड उरला आहे. यामुळे गतवर्षीपासून ऑरिकने बिडकीन औद्योगिक पट्ट्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले होते. ऑरिकमधील इंडस्ट्रीयल वापराकरिता असलेल्या एकूण जमिनीपैकी ९० टक्के जमीन विविध उद्योगांना वाटप झाली आहे. एमएसएमईंनीही बिडकीनसाठी भूखंडाची मागणी केली. बिडकीन डीएमआयसीमध्ये भूखंड कमी पडत असल्याचे निदर्शनास येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमात येथे आणखी ८ हजार एकर जमीन संपादित करण्याची घोषणा केली होती. डीएमआयसीकरीता नोटीफाइड गावांतील ही जमीन घेतली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांनी दिली. ते म्हणाले की, चिते पिंपळगाव, चितेगाव, खोडेगाव, घारदोन, घारदोन तांडा आणि गाडीवाट या गावांतील ही जमीन घेतली जाईल.

मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे भूखंडाची मागणी वाढलीटोयटा-किर्लोस्कर मोटार्स, लुब्रिझोल इंडिया, एथर एनर्जी आणि जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या मोठ्या कंपन्यांनी बिडकीन डीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर आणखी मध्यम उद्योगातील २२ कंपन्यांनी तेथे भूखंडाची मागणी केली होती..

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी