800 हातपंप बंद
By Admin | Updated: July 2, 2014 00:16 IST2014-07-02T00:09:24+5:302014-07-02T00:16:11+5:30
विलास चव्हाण , परभणी जून महिना संपला तरीही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही़

800 हातपंप बंद
विलास चव्हाण , परभणी
जून महिना संपला तरीही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही़ यामुळे पाणीपातळी एक मीटर खाली गेल्याने तब्बल ७०० ते ८०० हातपंप बंद पडली पडल्याने नागरिकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ प्रशासनाकडून म्हणाव्या तशा उपाययोजना अद्यापही करण्यात आल्या नाहीत़
गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली होती़ त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चकटे बसले नाहीत़ परंतु, जून महिना पावसाविना कोरडाठाक गेल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़ जिल्ह्यातील धरण, पाझर तलाव व बंधाऱ्यातील पाणीसाठा खालावत चालला आह़े़ तसेच भूजलपातळी खाली गेल्याने विहीर व हातपंप कोरडेठाक पडू लागले आहेत़
ग्रामीण भागात तब्बल ६ हजार १८६ हातपंप आहेत़ मे महिन्यात ही सर्व हातपंप सुरू होती़ परंतु, जून महिन्यात पाऊस न पडल्याने पाण्याविना तब्बल ७०० ते ८०० हातपंप बंद पडले आहेत़ यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़
सेलू व पालममध्ये भूजपातळीत दोन मीटरने वाढ
मागील पाच वर्षाच्या भूजलपातळीच्या सर्वेक्षणावरून तुलनात्मक अभ्यासावरून मे महिन्यांत घेण्यात आलेल्या भूजलपातळी सेलू व पालम तालुक्यात दोन मीटरने पाणीपातळीत वाढ झाली आहे़ तसेच पूर्णा व जिंतूर दीड मीटर, पाथरी, मानवत, गंगाखेड व परभणी तालुक्यातील भूजपातळीची एक मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ़ मेघा देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली़