शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

८० लाखांचा 'खड्डा'

By admin | Updated: September 2, 2014 01:53 IST

बीड : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बार्शी रोडवरील बिंदूसरा नदीच्या पुलावर ऐन मधोमध खड्डा पडला आहे़ त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़

बीड : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बार्शी रोडवरील बिंदूसरा नदीच्या पुलावर ऐन मधोमध खड्डा पडला आहे़ त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़ महामार्ग विभागाच्या वतीने तीन महिन्यापूर्वीच सुमारे ८० लाख रूपये खर्च करून या पुलाचे काम करण्यात आलेले आहे़ मात्र पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाल्याने महामार्ग विभागाचे पितळ उघडे पडले आहे़मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे़ या पावसाने सर्व रस्ते जलमय झाले असून ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे़ परिणामी खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्याचा आकार वाढत आहे़ बार्शी रोडवरील पुलावर देखील अशाच प्रकारचा खड्डा पडला़ त्यात पाणी साचल्याने हा खड्डा खचला आहे़ त्यावरील खडी व डांबर वाहून गेले असून गज उघडे पडले आहेत़ परिणामी वाहनचालकांना खड्डा चुकवून वाट काढावी लागते़ त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे़दरम्यान, तीन महिन्यापूर्वीच या पुलाच्या दुरूस्तीचे काम करण्यात आलेले होते़ त्यासाठी ८० लाख रूपये खर्च करण्यात आले होते़ इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही पुन्हा एकदा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़सोमवारी या खड्ड्यामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ शहरातील हा महत्वाचा पूल आहे़ महामार्गावर कायम वाहतुकीची वर्दळ असते़ अशा परिस्थितीत हा पूल खड्ड्यामुळे धोकादायक बनला आहे़ वर्षभरापूर्वीही पडला होता खड्डाबार्शी रस्त्यावरील पुलावर वर्षभरापूर्वी देखील अशाच प्रकारे खड्डा पडला होता़ प्रत्येक वर्षी या खड्ड्याची डागडुजी केली जाते़ त्यावर लाखोंचा निधीचा चुराडा केला जातो़ मात्र पुन्हा खड्डा पडत असल्याने या कामाचा दर्जा तपासला जातो की नाही असा सवाल मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे़ डागडुजीच्या नावाखाली महामार्ग विभागाच्या तिजोरीला खड्डा पडत आहे़ गुत्तेदारांना पोसण्यासाठीच निकृष्ठ काम करूनही दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही त्यांनी केला़ दुरूस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी त्यांनी केली़ (प्रतिनिधी)