‘लपा’चा ७७ कोटीचा आराखडा

By Admin | Updated: May 24, 2014 01:43 IST2014-05-24T01:23:40+5:302014-05-24T01:43:22+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने टंचाईग्रस्त गावांची संख्या लक्षात घेवून भविष्यात कराव्या लागणार्‍या उपाययोजनांचा आराखडात तयार केला आहे.

77 crore plan for LAPA | ‘लपा’चा ७७ कोटीचा आराखडा

‘लपा’चा ७७ कोटीचा आराखडा

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने टंचाईग्रस्त गावांची संख्या लक्षात घेवून भविष्यात कराव्या लागणार्‍या उपाययोजनांचा आराखडात तयार केला आहे. ७७ कोटी ७ लाख रूपये किंमतीच्या ६५३ कामांचा या कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. भविष्यात जसजसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार प्राधान्यक्रमाने ही कामे हाती घेतली जाणार आहेत. जिल्हाभरात सुमारे २५४ गावे ही टँकर ग्रस्त आहे. उन्हाळा आला की, सदरील गावांना टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागतो. यामध्ये सर्वाकिध ४३ गावे ही एकट्या भूम तालुक्यातील आहेत. टंचाईग्रस्त गावांची यादीही काही कमी नाही. ५१७ इतकी संख्या आहे. या गवांची तहान भागविण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रूपये खर्च होता. मात्र, सदरील सर्व उपाययोजना ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या ठरत आहेत. पावसाळा आला की पाण्याचा सुकाळ आणि उन्हाळा सुरू झाला की दुष्काळ हे चक्र काही बंद होत नाही. सदरील प्रश्न लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून गावनिहाय कृती आराखडा तयार केला आहे. या आरखड्यात तब्बल ७७१ गावे समाविष्ट करण्यात आली असून ६५३ गावे प्रस्तावित केली आहेत. टँकरग्रस्त आणि टंचाईग्रस्त या गावांमध्ये पाझर तलाव, कोल्हापुरी बंधार्‍यांची दुरूस्ती, खोलीकरण, नवीन सिमेंट बंधारे आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी किमान ७७ कोटी ७ लाख रूपये इतका निधी लागणार आहे. लघु पाटबंधारे विभागाला ही रक्कम एकाचवेळी मिळणार नसली तरी टप्प्या-टप्प्याने मिळाल्यानंतर प्राधान्यक्रमाने गावांतील प्रस्तावित कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी. एस. देवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टँकरग्रस्त गावांसाठी २६ कोटी जिल्हाभरातील टँकरग्रस्त गावांचा विचार केला असता हा आकडा २५४ वर जावून ठेपतो. यामध्ये भूम तालुक्यात ४३, उस्मानाबाद १३, तुळजापूर ८१, उमरगा ३९, लोहारा ०२, कळंब ३७, परंडा २० आणि वाशी तालुक्यात १९ गावांचा समावेश आहे. सदरील गावांच्या आराखड्यात २११ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये पाझर तलाव दुरूस्तीची ५४, कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती व खोलकरणाची ४९ तर नवीन सिमेंट नाला वा खोलकरणाची १०८ कामांचा समावेश आहे. यासाठी किमान २६ कोटी ८५ लाख ५० हजार रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. टंचाईग्रस्त गावांसाठी ५० कोटी टंचाईग्रस्त गावांची संख्याही काही कमी नाही. ही संख्या ५१७ इतकी आहे. सदरील गावांत मिळून पाझर तलावांची ८७, कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती व खोलकरणाची १४१, नवीन सिमेंट नाला बंधारा वा खोलकरण २१४ अशी ४४२ कामांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. ही सर्व कामे पूर्ण करून घेण्यासाठी जवळपास ५० कोटी २१ लाख ५० हजार रूपये खर्च लागणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आता ही कामे पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे कुठल्या गावात कोणत्या स्वरूपाची उपाययोजना आवश्यक आहे, हेही त्यात नमूद केले आहे. त्यानंतर नकाशाही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांचे काम केले असले तरी आरखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करू घेण्यासाठी आवश्यक निधी लोकप्रतिनिधींनाच खेचून आणावा लागणार आहे. त्यामुळे आता खर्‍याअर्थाने लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे. ते किती रेटा लावतात, त्यावरच या उपाययोजनांचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: 77 crore plan for LAPA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.