शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेच्या वादाचा भीषण शेवट! सून रक्तबंबाळ पाहून ७६ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:06 IST

छत्रपती संभाजीनगर हादरले! किरकोळ वाद सासूच्या जिवावर बेतला, सून आयसीयूमध्ये

छत्रपती संभाजीनगर : सासू-सुनेमध्ये कौटुंबिक कारणातून वाद उफाळले. संतापून सुनेने स्वत:च्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, शेजाऱ्यांची धाव व रक्तबंबाळ सुनेला पाहून ७६ वर्षीय सासूला जोराचा धक्का बसून ती क्षणात मृत्युमुखी पडली. मंगळवारी सकाळी या धक्कादायक घटनेने बीड बायपास परिसर हादरला.

घराघरात सासू-सुनेचे वाद नवे नाहीत. किरकोळ कारणांवरून खटके उडतात, अबोला धरला जातो आणि काही वेळाने पुन्हा सगळे पूर्ववत होते. मात्र, बीड बायपास परिसरात वाद सासूच्या जिवावर बेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरात राहणारे कृष्णा (नाव बदलले आहे) कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यांची दोन मुलेही शाळेत गेली. यानंतर काही वेळात घरात ४२ वर्षीय सून व ७६ वर्षीय सासूत वाद झाले. सुनेला राग अनावर झाला. संतापाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलत डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन ती बेशुद्ध पडली. यामुळे घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, अचानक झालेली गर्दी, समोर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुनेला पाहून ७६ वर्षीय सासूला जबर धक्का बसला आणि त्या क्षणातच जमिनीवर कोसळल्या.

दाेघींना रुग्णालयात दाखल केलेशेजाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेला शुद्ध आली नाही. काहींनी त्यांना घाटी रुग्णालयात नेले. तर सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे ब्लेडचा वार खोलवर गेल्याने सुनेची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली.

मानसिक धक्क्यामुळे मृत्यूसुरुवातीला घाटी रुग्णालयात ७६ वर्षीय वृद्धेला दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सायंकाळी अहवालात वृद्धेचा मृत्यू ‘डेथ ड्यू टू शॉक' असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Argument leads to suicide attempt, shock kills mother-in-law.

Web Summary : A domestic dispute escalated when a woman attempted suicide, shocking her 76-year-old mother-in-law, who died. The incident occurred in Chhatrapati Sambhajinagar. The daughter-in-law is hospitalized in critical condition. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर