छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:32 PM2024-04-25T16:32:00+5:302024-04-25T16:32:58+5:30

तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतून शहरात नारळ आणले जातात.

7.50 lakh coconuts burst in front of Hanuman in Chhatrapati Sambhajinagar; 30 trucks of goods arrived from three states | छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

छत्रपती संभाजीनगर : ’रामदूत अतुलित बल धामा, अंजनि-पुत्र पवनसूत नामा’... अशा बलशाली श्रीरामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव मंगळवारी (दि.२३) साजरा करण्यात येणार आला. वर्षभरात सर्वाधिक नारळ हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विक्री होत असतात. दिवसभरात जिल्ह्यात सुमारे ७.५० लाख नारळ भगवान हनुमानाच्या मूर्ती समोर फुटले , असा अंदाज मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी उलाढालीवरून वर्तविला आहे.

तीन राज्यांतून आले ३० ट्रक नारळ
तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतून शहरात नारळ आणले जातात. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भाविक नारळ खरेदी करीत असले तरी याची उलाढाल होलसेल मार्केटमध्ये गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. किरकोळ विक्रेते आपल्याकडे नारळाचा साठा करून ठेवतात. गुढीपाडव्यापासून ते हनुमान जन्मोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत ३० मालट्रक भरून नारळाचा पुरवठा झाला आहे. एका ट्रकमध्ये २५ हजार नारळ येतात. असे ७ लाख ५० हजार नारळ आणण्यात आले व होलसेल विक्रीत तेवढे नारळ आतापर्यंत विकले गेले आहेत.

पाणीदार नारळालाच मागणी
राज्यात नारळ उत्पादन यंदा ३० टक्कांनी कमी झाले आहे. यामुळे शेकड्यामागे १५० रुपयांनी भाव वाढले आहे. गुढीपाडव्याआधी १४०० ते १५०० रुपये शेकडा विक्री होणारे नारळ सध्या १५५० ते १६०० रुपयांपर्यंत विकत आहेत. किरकोळ विक्रीत मंदिरासमोर २० ते २५ रुपयांनी विक्री होईल. देवासमोर फोडण्यासाठी पाणीदार नारळलाच मागणी असते.

पाच दिवसांच्या आत नारळ फोडा
सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. कडक उन्हामुळे नारळातील पाणी कमी होते. साधारणत: पाच दिवसांनंतर नारळातील पाणी सुकते. यामुळे नारळाचा वापर पाच दिवसाच्या आतच करावा, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

हनुमान जन्मोत्सव व पोळ्याला विकतात सर्वाधिक नारळ
व्यापाऱ्यांनी सांगितले की, वर्षभरात दोन सणाला सर्वाधिक नारळाची विक्री होते. त्या हनुमान जन्मोत्सव व पोळ्याचा दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी नारळ विकताच त्याशिवाय प्रत्येक गावात याच काळात यात्रा भरत असते. त्या यात्रेत नारळाची उलाढाल मोठी होत असते.

Web Title: 7.50 lakh coconuts burst in front of Hanuman in Chhatrapati Sambhajinagar; 30 trucks of goods arrived from three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.