७४ देवस्थानच्या जमिनींचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: December 9, 2015 23:56 IST2015-12-09T23:26:29+5:302015-12-09T23:56:16+5:30
बीड : बेकायदेशीर हस्तांतरीत झालेल्या संस्थानांची संख्या ७४ एवढी असून या जमीनी शासनाच्या नावे करून घेण्यासा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याच इच्छाशक्तीचा आभाव असल्याचे चित्र जिल्हयात आहे.

७४ देवस्थानच्या जमिनींचे भिजत घोंगडे
बीड : बेकायदेशीर हस्तांतरीत झालेल्या संस्थानांची संख्या ७४ एवढी असून या जमीनी शासनाच्या नावे करून घेण्यासा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याच इच्छाशक्तीचा आभाव असल्याचे चित्र जिल्हयात आहे. बहुतांश देवस्थानांच्या जमीनीचे रेर्कार्डच अभिलेखा कार्यालयात उपलब्ध नाही.
शासनाच्या अहवालानुसार केवळ बीड जिल्हयात ७४ संस्थानाच्या शेकडो एकर जमीन लाटल्या आहेत. यात आश्चर्य म्हणजे बनावट फेरफार करून जमीनी बळकावल्याचे प्रकार समोर येत आहेत. मुळातच खासरा पत्रकावरील नावाच्या नोंदीच सातबारावर येणे होते. मात्र अशा कित्येक देवस्थानांच्या जमीनींचे खासरा पत्रकच तहसिलच्या अभिलेख कक्षात दिसून येत नाही. परंतु या जमीनीची सातबाराला नोंद आहे. यावरून ज्याला खासरा पत्रकच नाही. त्याचे सातबारा तयार कसे झाले. हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
१२ हेक्टर जमीन जातेय वहिवाटली
बीडच्या राममंदिर संस्थानची वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे १२ हेक्टर जमीन असुरक्षीत असून याबाबत अद्याप पर्यंत महसूल विभागाने ही जमिन पूर्वत देवस्थानच्या नावे लावण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई न न्यायालयाचा व शासन निर्णयाचा आनादर केला आहे.
माजलगावचे उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे म्हणाले की, याबाबत मला चौकशी करावी लागेल. (प्रतिनिधी)