शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Updated: July 17, 2024 19:53 IST

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी मराठवाड्यातील नदी, नाल्यांना पूर आलेला नाही. परिणामी, या वर्षी मराठवाड्यातील बहुतेक सर्वच लहान-मोठ्या धरणांनी तळ गाठलेला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४ टक्के जलसाठा उरला आहे, तर ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ४ धरणे कोरडी आहेत. मध्यम प्रकल्पांतही केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राहिलेल्या ७३ दिवसांत हे प्रकल्प कसे भरतील, याची चिंता प्रशासन आणि शेतकऱ्यांना सतावत आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज असल्याने दीड महिन्यात मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. नद्यांना पूर न आल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात केवळ ८९ द.ल.घ.मी. अर्थात ४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर सिद्धेश्वर (हिंगोली), मांजरा आणि माजलगाव (बीड) तसेच सीना कोळेगाव (धाराशिव) हे प्रकल्प कोरडे आहेत. केवळ येलदरी प्रकल्पात २८ टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ३० टक्के, निम्न तेरणा १६ टक्के तर निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ओसंडून वाहणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात ४४ तर निम्न दुधना प्रकल्पात ४ टक्के पाणी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मराठवाड्यात जून ते ऑगस्टपर्यंतच मौसमी पाऊस पडतो. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस पडत असतो. यामुळे आता चांगल्या पावसाचे केवळ ७३ दिवस उरले आहेत. या कालावधीत मुसळधार पावसाची प्रकल्पांना प्रतीक्षा आहे.

मध्यम प्रकल्पाचीही दयनीय अवस्थामोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ आणि जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांमध्ये केवळ सरासरी ३ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत ६, नांदेड जिल्ह्यातील ९ धरणांत १७ व परभणी जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ७ टक्के जलसाठा उरल्याचे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी सांगितले.

मागील दोन वर्षांच्या तुलनेत अत्यल्प साठामध्यम प्रकल्पाच्या मागील दोन वर्षांतील एकूण प्रकल्पांच्या सरासरी जलसाठ्याच्या तुलनेत हा जलसाठा अत्यल्प आहे. २०२२ मध्ये मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पात सरासरी ३१ टक्के पाणीसाठा होता. तर गतवर्षी २०२३ मध्ये १७ टक्के होता. या वर्षी केवळ ८ टक्के आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी