७२०७ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा

By Admin | Updated: May 8, 2015 00:27 IST2015-05-08T00:18:02+5:302015-05-08T00:27:37+5:30

लातूर : राज्य शासनाच्या वतीने शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी एमएचसीईटीची परीक्षा गुरुवारी

7207 students gave CET exam | ७२०७ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा

७२०७ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा


लातूर : राज्य शासनाच्या वतीने शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी एमएचसीईटीची परीक्षा गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत शहरातील १७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली़या परीक्षेसाठी ७ हजार ३३० विद्यार्थी पात्र होते़ त्यापैकी ७२०७ विद्यार्थ्यांनी दिली़ तर १२३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली़
बारावीच्या विद्यार्थ्यांचे या परीक्षेवर वैद्यकीय प्रवेशाचे भवितव्यासाठी अवलंबून असल्याने ही परीक्षा महत्वाची मानन्यात येते़ या परीक्षेसाठी ७ हजार ३०३ विद्यार्थी पात्र ठरले होते़ पण गुरूवारी परीक्षेसाठी ७२०७ विद्यार्थी उपस्थित होते़ या परीक्षेसाठी १२३ विद्यार्थी गैरहजर होते़ शहरातील कॉक्सिट महाविद्यालयात दोन परीक्षा केंद्र, केशवराज विद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयत दोन परीक्षा केंद्र, दयानंद लॉ कॉलेज, दयानंद कला महाविद्यालय, श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, मारवाडी राजस्थान विद्यालय, महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविद्यालय, राजर्षी शाहू कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, परिमल महाविद्यालय या १७ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली़
या परीक्षेच्या कामकाजासाठी ६५० कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ सीईटीची परीक्षा शहरातील १७ परीक्षा शांततेच पार पडल्याची माहिती जिल्हा संपर्क अधिकारी डॉ़ विनायक आघाव यांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: 7207 students gave CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.