शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

मागितले ६८ अन् मिळाले १४ कोटी

By admin | Updated: June 2, 2016 23:23 IST

परभणी : २०१४-१५ च्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान गुरुवारी प्राप्त झाले आहे़

परभणी : २०१४-१५ च्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान गुरुवारी प्राप्त झाले आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्याने ६८ कोटी ४७ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती़ मागणीच्या तुलनेत केवळ २० टक्के अनुदान प्राप्त झाल्याने अनेक लाभार्थी शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ८४८ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाली आहेत़ या दुष्काळी गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून थेट आर्थिक मदत दिली जात आहे़ यापूर्वी दोन टप्प्यात जिल्ह्याला अनुदान प्राप्त झाले होते़ हे संपूर्ण अनुदान वाटप केल्यानंतरही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने एप्रिल महिन्यात जिल्हा प्रशासनाने दुष्काळी भागातील १ लाख ५ हजार शेतकरी आणि साधारणत: ९० हजार हेक्टर क्षेत्रासाठी ६८ कोटी ४७ लाख रुपये वाढीव अनुदानाची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती़ या मागणीनुसार गुरूवारी केवळ १४ कोटी २० लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत़ खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने तातडीने उपाययोजना करीत हे अनुदान तहसीलस्तरावर वितरित केले आहे़ प्राप्त झालेल्या १४ कोटी ४१ लाख रुपयांमधून परभणी तालुक्यासाठी २ कोटी ८८ लाख, गंगाखेड तालुक्याला ९५ लाख, पूर्णा १ कोटी ५ लाख, पालम तालुक्यासाठी २ कोटी ८९ लाख, सोनपेठ तालुक्यासाठी ७६ लाख, मानवत तालुक्यासाठी १ कोटी ३५ लाख, सेलू ३३ लाख आणि जिंतूर तालुक्यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम तहसीलदारांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ आतापर्यंत परभणी जिल्ह्याला २०० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ४०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी नोंदविली आहे़ (प्रतिनिधी)एक लाख : शेतकरी वंचितपरभणी जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी आहेत़ मागील वर्षी जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाली़ या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४०० कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती़ यापूर्वीच दोन टप्प्यात अनुदान मिळाले़ ४हे अनुदान वाटप केल्यानंतरही अनुदानपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण जिल्हा प्रशासनाने केले होते़ त्यानुसार १ लाख ५ हजार शेतकरी वंचित होते़