शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 6:43 PM

मराठवाड्यात दुष्काळामुळे चा-याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसत आहेत.

औैरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे चा-याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारीपर्यंत चारा पुरेल, अशी स्थिती असताना चारा छावणीला द्यायचा की दावणीला, याबाबतचे धोरण सरकारी दरबारी ठरलेले नाही.

परिणामी, पुढील सहा महिने म्हणजेच जून २०१९ पर्यंत शेतकºयांना जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे आहेत. ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० टन इतका चारा लागतो.

जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाºयाची आवश्यकता असते. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणे शक्य आहे. जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच हा चारा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात मराठवाड्यात कमी पाऊस झाला. ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले, शिवाय चाराही उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे. जून २०१९ पर्यंत चारा कमी पडणार नाही. एका गावात पिण्यासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा होत असेल, तर पशुधनासाठी देखील दोन टँकर पिण्याचे देण्याबाबत तातडीने तरतूद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांना पशुसंवर्धनमंत्र्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दिले होते; परंतु त्यानुसार काहीही निर्णय झालेला नाही.

काय म्हणाले होते पशुसंवर्धनमंत्री...मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. चारा दावणीला देणे शक्य नाही. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी १३ डिसेंबर रोजी स्पष्ट केले होते. दीड महिना होत आला असून चारा छावणीबाबत काहीही निर्णय झालेला नाही. ३ किलो सुका व ७ किलो ओला असे १० किलो चारा प्रतिदिन उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेणार असल्याचे जानकर म्हणाले होते.

महसूल उपायुक्तांची माहिती अशीप्रभारी महसूल उपायुक्त डॉ. विजयकुमार फड म्हणाले, चारा छावण्याबाबत शासनाकडून अजून कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. तसेच शासनाकडून अजून काहीही सूचना विभागीय प्रशासनाला आलेल्या नाहीत.

 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा