सुभेदारी विश्रामगृहाकडे ६.५० लाखांची थकबाकी, महावितरणने कापली वीज; ४५ सूट अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:48 IST2025-02-26T13:47:39+5:302025-02-26T13:48:13+5:30

महावितरणने वारंवार आवाहन करूनही बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की सा. बां. विभागावर आली. 

6.50 lakh dues to Subhedari Goverment Rest House, power cut by Mahavitaran; 45 suits in the dark | सुभेदारी विश्रामगृहाकडे ६.५० लाखांची थकबाकी, महावितरणने कापली वीज; ४५ सूट अंधारात

सुभेदारी विश्रामगृहाकडे ६.५० लाखांची थकबाकी, महावितरणने कापली वीज; ४५ सूट अंधारात

छत्रपती संभाजीनगर : महावितरणने ६.५० लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीमुळे शहरातील सुभेदारी विश्रामगृहाचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी खंडित केला. त्यामुळे येथील ४५ ‘सूट’ अंधारात बुडाले. सा. बां. विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सुभेदारीचे सुमारे ६.५० लाख रुपयांचे वीजबिल अनेक दिवसांपासून भरले गेलेले नाही. 

महावितरणने वारंवार आवाहन करूनही बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की सा. बां. विभागावर आली. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. पूर्ण बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा जोडून न देण्याचा पवित्रा महावितरणने घेतल्याचे समजते. ४५ ‘सूट’चा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिली.

‘व्हीआयपी’ सूटचा पुरवठा सुरळीत
सुभेदारी विश्रामगृहात ४ वीज जोडण्या आहेत. यातील ३ वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, मुख्य इमारत आणि व्हीआयपी सूटचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे.

Web Title: 6.50 lakh dues to Subhedari Goverment Rest House, power cut by Mahavitaran; 45 suits in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.