शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

६४ कोटी रुपये पडून

By admin | Updated: July 18, 2014 01:52 IST

औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला.

औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, एवढे दिवस होऊनही त्यातील ६४ कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वाटपाअभावी पडून आहे. त्यामुळे विभागातील हजारो शेतकरी अजूनही गारपिटीच्या मदतीपासून वंचित आहेत.या परिस्थितीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले. कोरडवाहूसाठी १० हजार, बागायती १५ हजार आणि फळबागांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे सरकारने जाहीर केले.त्यानुसार मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ९९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी ९७० कोटी रुपयांचा निधी २५ मार्च ते १३ मे या काळात तीन टप्प्यांत मराठवाड्यास प्राप्त झाला. मात्र, प्रशासनाकडून अतिशय कासवगतीने त्याचे वाटप सुरू आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा प्रशासनाकडून ही मदत जमा करावी, अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या होत्या. तरीही आतापर्यंत केवळ ९०६ कोटी रुपयांचेच वाटप झालेआहे. अद्याप ६४ कोटी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून आहे. आतापर्यंत एकूण १५ लाख ४० हजार शेतकऱ्यांनाच ही मदत मिळाली आहे. आणखी सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद, अशा सर्वच जिल्हाधिकाऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात गारपीटग्रस्तांसाठीचा निधी पडून आहे. साडेआठ लाख हेक्टरवरील नुकसानमराठवाड्यात फेबु्रवारीअखेरीस अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे ८ लाख ५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाले.