शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

धारूर येथे ६० हजार रोपे लागवडीसाठी सज्ज

By admin | Updated: May 24, 2014 01:34 IST

अनिल महाजन, धारुर ‘झाडे लावा, झाडे जगवा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासारखे अनेक संदेश शासनाच्या माध्यमातून दिले जातात.

अनिल महाजन, धारुर ‘झाडे लावा, झाडे जगवा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासारखे अनेक संदेश शासनाच्या माध्यमातून दिले जातात. मात्र याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. परंतु येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने सुमारे ६० हजार रोपे तयार करुन इतर कार्यालयासमोर आदर्श निर्माण केला आहे. लवकरच ही रोपे लोकार्पण केले जाणार असून, याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. धारुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने येणार्‍या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी मागील सात महिन्यांपासून जोपासलेली ६० हजार रोपे लागवडीसाठी सज्ज झाली आहेत. भर उन्हाळ्यात येथील कर्मचार्‍यांनी याची निगराणी केली. तालुक्यात दोन ठिकाणी रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये धुनकवड व आरणवाडी यांचा समावेश आहे. सात महिन्यांपासून रोपांच्या लागवडीपासून ते त्यांच्या जोपासण्यापर्यंतचे काम येथील कर्मचार्‍यांनी चोखपणे बजावले आहे. आरणवाडी येथील रोपवाटिकेत मग्रारोहयोतून ६० हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. याचे संवर्धन करण्यात येत असून, ही रोपे एक महिन्यानंतर लागवडीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या रोपांचे वृक्षारोपण वन विभागाच्या जमिनीत व गरजूवंत शेतकर्‍यांसाठी मोफत देण्यात येणार आहेत. यामध्ये सीताफळ, शेपू, आवळा, काचन, शिवण, चिंच, करज, काशीद, अमलतास, लिंब आदी झाडांची रोपे जोपासण्यात आली आहेत. येथे सात महिन्यांपासून १० ते १५ मजुरांसह वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. अधिकारी, कर्मचार्‍यांनी लक्ष दिल्यामुळे ही रोपे हिरवीगार दिसू लागली आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. शिंदे, वनपाल ए.एन. काकडे, वन कर्मचारी संभाजी पारवे आदी कर्मचार्‍यांनी येथे परिश्रम घेतले. ज्यांना रोपांची आवश्यकता आहे अशांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रोपे मोफत उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे.