शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के अग्निरोधक कालबाह्य

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

उस्मानाबाद : अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १ हजार ९३ शाळांना अग्निरोधक मागील चार वर्षापूर्वी वितरित केले आहेत.

उस्मानाबाद : अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १ हजार ९३ शाळांना अग्निरोधक मागील चार वर्षापूर्वी वितरित केले आहेत. या अग्निरोधकांचा केवळ एक वर्षाची वॉरंटी मुदत होती. त्यानंतर रिफिलींग करणे आवश्यक होते. मात्र अधिकाऱ्यांसोबतच मुख्याध्यापकांचेही दुर्लक्ष झाल्याने तब्बल ६० टक्क्यावर अग्निरोधक कालबाह्य झाले आहेत. शनिवारी तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत गॅसवर पोषण आहार शिजवत असताना अचानक गॅसचा भडका उडाला. नजीकच्याच पेट्रोलपंपावरुन अग्निरोधक आणून ही आग विझविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या शाळेलाही अग्निरोधक पुरविण्यात आले आहेत. परंतु ते कार्यान्वित झाले नाही.तुळजापूर येथील न्यायालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत पोषण आहार गॅसवर शिजविला जात आहे. नित्यनियमाप्रमाणे शनिवारी संबंधित कर्मचारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पोषण आहार शिजवत असतानाच सिलेंडरपासून शेगडीकडे गेलेल्या गॅसच्या पाईपने अचानक पेट घेतला. हे पाहून येथील कर्मचारीही घाबरून गेले. तर काहींनी पळ काढला. धुराचे लोट पाहून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. काही शिक्षकांनी प्रसंगावधान राखून शाळेपासून नजीक असलेल्या पेट्रोलपंपावरुन अग्निरोधक आणून आग आटोक्यात आणली. तोवर या आगीत शाळेतील अ‍ॅप्लीफायर, खुर्ची, कुकर, शेगडी जळून खाक झाली. या घटनेवेळी शाळेतील दोनशेवर विद्यार्थी कवायत मैदानावर होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अशा स्वरुपाच्या घटना लक्षात घेऊन मागील चार वर्षापूर्वी जिल्ह्यातील १ हजार ४० प्राथमिक शाळा आणि ५३ माध्यमिक शाळांना अग्निरोधक पुरविण्यात आले होते. यावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. सदरील अग्निरोधके एक वर्षानंतर पुन्हा रिफीलिंग करावी लागतील, असे संबंधित कंपनीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविले होते. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविली होती. मात्र चार वर्ष लोटले तरीही ६० टक्के अग्नीरोधकांचे रिफीलींग केले नसल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याचाच प्रयत्य तुळजापूरच्या शाळेत आला. तेथील अग्निरोधक कार्यान्वित झालेले नाहीत. त्यामुळे आतातरी शिक्षण विभागाने ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) अनेक शाळांतील अग्निरोधक पडले अडगळीलाअग्निरोधक हे दर्शनी भागामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. तशा त्या यंत्रावरही सूचना दिलेल्या असतात. मात्र अनेक शाळांकडून या सूचनेकडे कानाडोळा होताना दिसत आहे. काही शाळांत ही अग्निरोधके कपाटात, रद्दीच्या गठ्यावर तर काही शाळांमध्ये सहजासहजी नजरेस पडणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवले आहेत. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.प्रशिक्षणही नाहीचार वर्षापूर्वी शाळांना अग्निरोधक यंत्र पुरविण्यात आली. यातील ७० टक्क्यांवर अग्निरोधक कालबाह्य झाले आहेत. त्यांचे रिफिलींग करणे आवश्यक आहे. असे असतानाच दुसरीकडे त्या-त्या शाळेवरील शिक्षकांनाही अग्निरोधकाच्या वापराबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे या गुरुजींना वापराबाबत प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. उपशिक्षणाधिकारी म्हणतात...एक-दीड वर्षापूर्वी अशीच एका शाळेमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अग्निरोधकाचे रिफीलींग करुन देण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र त्याचा अहवाल आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे आणखी एक वेळा सर्व मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना अग्निरोधकांचे रिफीलींग करण्याबाबत सूचित करण्यात येईल, उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.