शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

दुष्काळग्रस्त ३०० विद्यार्थ्यांना मंदा म्हात्रेंकडून सहा लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 02:45 IST

३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची रोख आर्थिक मदत

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या ओल्या दुष्काळग्रस्त भागातील ३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची रोख आर्थिक मदत बेलापूरच्या (नवी मुंबई) भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी केली. विद्यार्थी ओल्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असल्याचे वृत्त पाहिल्यानंतर आ. म्हात्रे यांनी विद्यापीठात येत थेट विद्यार्थ्यांच्या हातातच मदतीचे पाकीट दिले.विद्यापीठात मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी शिक्षण घेतात. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विद्यापीठातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची यादी बनविण्यास सांगितले. बुधवारी दुपारी २ वाजता आ. म्हात्रे सहकाऱ्यांसह विद्यापीठात दाखल झाल्या. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी २५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख मदतीचे वाटप केले.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेdroughtदुष्काळStudentविद्यार्थीEducationशिक्षण