६ कोटींचे बिल थकले

By Admin | Updated: October 14, 2014 00:40 IST2014-10-14T00:33:55+5:302014-10-14T00:40:18+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक कृषी पंप आहेत. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे.

6 crores bill tired | ६ कोटींचे बिल थकले

६ कोटींचे बिल थकले

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक कृषी पंप आहेत. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सहा कोटींपेक्षा अधिक वीज बिल थकल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. दुष्काळ, अतिवृष्टी आणि दुबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांनी बाहेर येऊन विविध पिकांची पेरणी केली आहे. शेवटच्या काही दिवसांत पाऊस चांगला झाल्याने पिकांना उभारी मिळालेली आहे.
पिकांना सध्या पाण्याची गरज असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना पाणी देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. जिल्ह्यामध्ये २,९०,२३६ कृषी पंपधारक शेतकरी आहेत. सर्वच जण पिकांना पाणी देत आहेत. त्यामुळे महापारेषणकडून जीटीएलला योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम शहरी भागातील वीजपुरवठ्यावर होत आहे.
यामुळे शहरी भागातील वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. शहरात भलत्या वेळेला अघोषित भारनियमन होत असल्यामुळे आॅक्टोबर हिट व निवडणुकीचा काळ गरमी वाढवत आहे.

Web Title: 6 crores bill tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.