शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

उद्घाटनापूर्वीच चिकलठाणा सामान्य रुग्णालयाची ५८ लाखांची औषधी कालबाह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 12:22 IST

चिकलठाणा येथील २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५८ लाख रुपयांचा औषधी खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपयांची औषधांची खरेदी करून ठेवली आहे. शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने हे औषध खरेदीचा घोटाळा उघडकीस आणला ५८ लाख रुपयांची औषधी एक्स्पायर झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : चिकलठाणा येथील २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५८ लाख रुपयांचा औषधी खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपयांची औषधांची खरेदी करून ठेवली आहे. त्यातील ५८ लाख रुपयांची औषधी एक्स्पायर झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने हे औषध खरेदीचा घोटाळा उघडकीस आणला असून, दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली आहे.

घाटी रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी व्हावा यादृष्टीने काँग्रेस आघाडी सरकारने २०११ मध्ये चिकलठाणा येथे २०० खटांचे रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली. शासन एवढ्यावरच न थांबता रुग्णालयाच्या बांधकामासाठी, साधनसामग्रीच्या खरेदीसाठीही भरीव आर्थिक तरतूद केली. एकूण ३८ कोटी रुपये खर्च करून चिकलठाण्यात आज भव्य-दिव्य रुग्णालयाची इमारत उभी आहे. मागील दोन वर्षांपासून विद्युत विभागाची कामे, नळजोडणी, कर्मचारी भरती, अद्ययावत यंत्र सामग्री खरदी आदी कारणे सांगून लोकार्पण टाळण्यात येत आहे. रुग्णालयाचा संपूर्ण कारभार जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत आतापर्यंत सुरू आहे.

जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू असतानाच कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी करून ठेवली. रुग्णालयच सुरू नसताना ही औषधी का आणि कशासाठी खरेदी केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. जेवढी औषधी खरेदी केली होती त्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी एक्स्पायर झाली आहे. ही सर्व औषधी खोल खड्ड्यात नेऊन टाकावी लागणार आहे. शासनाच्या भांडार पडताळणी अधिका-यांच्या पथकाने सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची चौकशी केली असता हे विदारक सत्य समोर आले. पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनाम केला. एक्स्पायर झालेली औषधी त्वरित बाजूला करण्यात आली.

कागदपत्रांची लपवाछपवीभांडार पडताळणी पथकाने जेव्हा औषध खरेदी घोटाळ्याची नियमानुसार तपासणी सुरू केली तेव्हा जिल्हा सामान्य चिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी एकही कागद उपलब्ध करून दिला नाही. संपूर्ण रेकॉर्ड लपवून ठेवण्यात आले.

दोषींवर जबाबदारी निश्चित कराभांडार पडताळणी अधिका-यांनी १ नोव्हेंबर रोजी आरोग्य उपसंचालकांना पाठविलेल्या सविस्तर अहवालात नमूद केले आहे की, या गंभीर प्रकरणात दोषींवर अगोदर जबाबदारी निश्चित करावी. शासनाला कोट्यवधींचा चुना लावणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करावी याचा अनुपालन अहवाल आमच्या कार्यालयास सादर करावा, असेही अहवालात नमूद केले आहे.

टक्केवारीसाठी कोट्यवधींची खरेदीचिकलठाणा रुग्णालयाच्या नावावर करण्यात आलेली खरेदी नियमानुसार झाली किंवा नाही, यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाचे उल्लंघन झाल्याचा दाट संशय भांडार पथकाने उपस्थित केला आहे. मोठ्या कंपन्यांकडून मोठी टक्केवारी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आल्याचेही समोर येत आहे.

टॅग्स :medicineऔषधंAurangabadऔरंगाबादGovernmentसरकारHealthआरोग्यdoctorडॉक्टर