शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उर्दूच्या प्रश्नपत्रिकेत ५४ चुका!

By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्रता सिद्ध करणारी ‘टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) रविवारी शहरातील एकूण ४२ केंद्रांवर घेण्यात आली.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्रता सिद्ध करणारी ‘टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) रविवारी शहरातील एकूण ४२ केंद्रांवर घेण्यात आली. १८ हजार ६३९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली; परंतु उर्दू माध्यमाच्या छापील प्रश्नपत्रिका न देता हस्तलिखिताच्या स्वरूपात देण्यात आल्या. त्यात तब्बल ५४ चुका असल्याचे लक्षात आल्याने गोंधळ उडाला. परीक्षा परिषदेने उर्दू भाषा माध्यमांच्या प्रश्नपत्रिका डीटीपी करून छापील स्वरूपात तयार केल्या नव्हत्या, तर हस्तलिखिताच्या झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यात चुकाच चुका असल्याने परीक्षार्थी गोंधळून गेले. या सर्व प्रकाराचा उर्दू शिक्षक संघटनेने निषेध नोंदविला. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शेख मोईनोद्दीन नजिरोद्दीन यांनी सांगितले की, राज्य परीक्षा परिषदेची उर्दू भाषेविषयीची अनास्थाच यातून स्पष्ट झाली आहे. डीटीपी स्वरूपातील छापील प्रश्नपत्रिका देण्याचे नियोजनही परीक्षा परिषद करू शकली नाही, त्यामुळे परिषदेने यापुढे उर्दू माध्यमाची परीक्षाच घेऊ नये, याविषयीची तक्रार आपण आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले की, शहरातील ४२ केंद्रांवर रविवारी (दि.१४) टीईटी घेण्यात आली. ही परीक्षा शांततेत पार पडली असून त्यात सकाळच्या सत्रात ३३ केंद्रांवर पहिला पेपर झाला. त्यासाठी १२ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते; परंतु प्रत्यक्षात ११ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.