तख्त सचखंड साहिब येथे ५४ जोडपी विवाहबद्ध
By Admin | Updated: May 12, 2014 00:03 IST2014-05-11T23:40:02+5:302014-05-12T00:03:06+5:30
नांदेड: गत २५ वर्षांपासून तख्त सचखंड बोर्डतर्फे दर दोन वर्षांनी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात यंदा ५४ जोडपी विवाहबद्ध झाली़

तख्त सचखंड साहिब येथे ५४ जोडपी विवाहबद्ध
नांदेड: गत २५ वर्षांपासून तख्त सचखंड बोर्डतर्फे दर दोन वर्षांनी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात यंदा ५४ जोडपी विवाहबद्ध झाली़ १० व ११ मे रोजी जत्थेदार सिंघ साहेब बाबा कुलवंतसिंघजी व सर्व पंजप्यारे साहिबान यांच्या सरपरस्तीमध्ये हा सोहळा घेण्यात आला़ १० मे रोजी सर्व वधू-वरांची सगाई करण्यात आली़ ११ रोजी सकाळी साडेअकरा वाजता साहिब श्री गुरु गं्रथ साहिब जी महाराजच्या पावन हजूरीमध्ये जत्थेदार बाबा कुलवंतसिंघजी, भाई ज्योतिंदरसिंघजी, भाई कश्मीरसिंघजी, हेड ग्रंथी, सिंघ साहिब ग्यानी अवतार सिंघजी, शीतल का़मित ग्रंथी, भाई रामसिंघजी धुपीया, संतबाबा नरिंदरसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी, संतबाबा प्रेमसिंघजी, गुरुद्वारा प्रशासकीय समितीचे चेअरमन डॉ़विजय सतबीरसिंघजी व जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला़ यावेळी सचखंड पत्रिकेच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ कार्यक्रमात जोडप्यांना शाल, शिरेपावसह संसारोपयोगी साहित्य देण्यात आले़ यावेळी संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी मनोगतात सर्वांना शुभेच्छा देवून पुढील विवाह महोत्सव ६ व ७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले़ या विवाह सोहळ्याला गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स़रणजितसिंघ चिरागिया, बलबीरसिंघजी, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते, प्रकाश मारावार, दिलीप ठाकूर, स़सुरेंदरसिंघजी, गुरुचरणसिंघ घडीसाज, गुलाबसिंघ कंधारवाले, सुखविंदरसिंघ हुंदल, जर्नेलसिंघ गाडीवाले, शेरसिंघ फौजी, शरणसिंघ सोडी यांची उपस्थिती होती़(प्रतिनिधी)