चंदनझिऱ्यात ५ किलो गांजा जप्त
By Admin | Updated: September 14, 2014 23:57 IST2014-09-14T23:52:50+5:302014-09-14T23:57:32+5:30
चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या लगत असलेल्या लहूजीनगर येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चंदनझिऱ्यात ५ किलो गांजा जप्त
चंदनझिरा : जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या लगत असलेल्या लहूजीनगर येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्याबरोबर पाळत ठेवून चंदनझिरा पोलिसांनी आरोपी त्र्यंबक आश्रुबा जाधव याच्या घरावर छापा मारला. यात ४ किलो ८०० ग्रॅम गांजा गाढळून आला. हा छापा शनिवारी रात्री ८.३० वाजता मारला.
चंदनझिरा पोलिस ठाण्यात एका खबऱ्याने लहूजीनगर भागात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती दिली.
ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधीत भागात जाऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह सहायक निरीक्षक दतात्रय पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश जोशी, जमादार शेख नजीर, संजय कटके, अविनाश नरवडे, महिला कर्मचारी अवचार, राठोड आदींनी घरावर छापा मारला. यात गांजा जप्त करण्यात आला.
पंचासमक्ष हा गांजा तराजूने मोजून आरोपी त्र्यंबक जाधवला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अधिक तपास सपोनि पाटील करीत आहेत. शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)