छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक
By सुमित डोळे | Updated: December 29, 2023 13:32 IST2023-12-28T20:15:31+5:302023-12-29T13:32:47+5:30
२०२२ च्या तुलनेत शंभर पटीने वाढल्या तक्रारी, २,६७५ नागरिक ऑनलाइन आमिषाला पडले बळी

छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : यंदाचे वर्षे शहरातील पतसंस्था, को-ऑपरेटिव्ह बँकांच्या घोटाळे, आर्थिक फसवणुकीच्या कोट्यवधींच्या आकड्यांनी गाजले. २०२२ च्या तुलनेत फसवणुकीत यंदा १०० पटीने वाढ हाेत ४९० कोटींची फसवणूक नोंदवली गेली. यात २,६७५ नागरिक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले.
विशेष म्हणजे, यात टेलिग्राम, क्रेडिट कार्ड, वर्क फ्रॉम होमचे फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक राहिले. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्याने शहरवासीयांना अचंबित केले. त्यानंतर शहरात घोटाळ्यांची मालिकाच सुरू होत जवळपास १२ घोटाळे उघडकीस आले. देवाई, आभा, आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि., ज्ञानोबा यांचा यात समावेश होता. यात हजारो सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले. मात्र, त्या व्यतिरिक्त जवळपास ६१ फसवणुकीचे प्रकार शहरात घडले.
प्रमुख मुख्य गुन्हे
पोलिस ठाणे - घोटाळ्याची रक्कम
छावणी - १,१४,३३,४२५
सिटी चौक -१०,०७,००,०००
सिडको -१०३,१६,७३,३८१
सिडको - १,२२,६८,६८९
सिडको -३५,९०,१९,९९१
सिडको -२,८८, १७,५९३
सिडको - ९९,०७,९०,५७९
सातारा -२१,९४,७७,४९६
मुकुंदवाडी -१,१४,३३,४२५
एम. वाळूज - ४,८४,५८,९३९
सिटी चौक - ९७,४१,००,०००
क्रांती चौक -६८,००,०००
आर्थिक गुन्हे शाखेकडे नोव्हेंबर अखेर १०,२२७,५२०,४०२ कोटी रुपयांची फसवणुकीचे ५८ अर्ज प्राप्त झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
-२०२२ मध्ये ३ कोटी ५४ लाख ४८ हजार ७०५ रुपयांच्या फसवणुकीत ३१ गुन्हे.
-२०२१ मध्ये १४ कोटी ५५ लाख ७१ हजार १२८ रुपयांच्या फसवणुकीत २२ गुन्हे.
इंटरनेटचे तोटे, ३,८६८ नागरिक अडकले
इंटरनेटच्या फायद्यांसह तोटेही जाणवत आहेत. यंदा ३,८६८ नागरिक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडून ७ कोटींपेक्षा अधिक रक्कम लंपास झाली.
वर्ष - फसवणुकीचे अर्ज
२०२१ - १,३०८
२०२२ - २,८५२
२०२३ - ३,८६८
प्रकार तक्रारी प्रलंबित
ऑनलाइन फ्रॉड - २,६७५ - १४३५
सोशल मीडिया - १,१९३ - ५०१
टेलिग्राम - १२ %
वर्क फ्रॉम हाेम - ११ %
क्रेडिट कार्ड - १५ %
इन्शुरन्स/पॉलिसी - १४ %
गुगलवर हेल्पलाइन क्र. शोधणे - ५ %
सेक्साॅर्टशन - १८ %
इंस्टंट लोन ऍप - १८ %
इतर - ७ %