स्क्रिनींगमध्ये ४८२ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:45 PM2017-11-18T23:45:23+5:302017-11-18T23:45:23+5:30

जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

482 children malnourished in screening | स्क्रिनींगमध्ये ४८२ बालके कुपोषित

स्क्रिनींगमध्ये ४८२ बालके कुपोषित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र कुपोषित बालके व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात आले असून बालकांना चौरस आहार दिला जाईल असे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी (महिला व बाल) सांगितले. अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वयोगटातील बालकांचे दरमहा वजन घेऊन त्यानुसार बालकांची श्रेणी ठरविण्यात येते. आॅक्टोबर महिन्यात घेतलेल्या एकूण ९९ हजार ९७५ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ८३ हजार १०८ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी ७१ हजार ५६९ बालके सर्वसाधारण श्रेणी (८६.१२ टक्के) ९ हजार २४१ बालके मध्यम कमी वजनांची (११.१२ टक्के) २ हजार २९८ तीव्र कमी वजनांची बालके (२.७६ टक्के) आहेत. जिल्ह्याच्या मासिक प्रगती अहवालावरुन सद्य:स्थितीत असलेले आकडेवारी आहे.
ग्राम बाल विकास केंद्रामध्ये बालकांना चौरस आहार तसेच औषधोपचार यासह इतर आवश्यक सुविधा असणार आहेत. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी बालकल्याणकडून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील बालकांची तपासणी व सकस आहार बाबत पालकांना समूपदेशन केले जात आहे.

Web Title: 482 children malnourished in screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.