शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ४३ अर्भक रस्त्यावर

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

औरंगाबाद ; जन्मदाते जिवंत असूनही मागील वर्षभरात ४३ बाळांना अनाथ म्हणून जगावे लागत आहे.

औरंगाबाद ; जन्मदाते जिवंत असूनही मागील वर्षभरात ४३ बाळांना अनाथ म्हणून जगावे लागत आहे. त्या अभागी मातेच्या पोटी जन्म घेतला यात त्या बालकांचा काय दोष; पण आई असूनही तिच्या दुधाला ही बालके आज मुकली आहेत. एवढा निष्ठुरपणा, की बाळाला कचराकुंडी, रस्त्यावर, शेतात, घाटीत बेवारस अवस्थेत टाकून १८ मातांनी पळ काढला, तर २५ मातांनी आपली जबाबदारी झटकत पोटच्या गोळ्याला शासनाच्या पदरात टाकून दिले. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळांना टाकून दिल्याच्या या घटना कोणत्या मेट्रो सिटीत नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यात घडल्या आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात १५ मुलींवर विवाहापूर्वीच मातृत्व लादले गेले आहे. पण पोलिसात तक्रार नसल्याने आजही दोषी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. शालेय मुलगी, तरुणी, महिला मग ती शहरातच काय ग्रामीण भागातही सुरक्षित नाही हे या घटनांवरून प्रखरतेने जाणवत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून किंवा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या काही घटनाच समोर येतात; पण कुटुंबाच्या इज्जतीपायी अनेक प्रकरणे दाबली जात आहेत. गर्भधारणा झाल्यावर ‘तो मी नव्हेच’ असे प्रियकराने हात झिडकारेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जन्म दिल्यानंतर आईने बाळाला कमीत कमी ६ महिने तरी दूध पाजणे गरजेचे असते; पण कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने नवजात अर्भकांना टाकून दिले जात आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ बालके बेवारस अवस्थेत टाकून दिलेली पोलिसांना आढळून आली.