४२ संस्था अवसायनात !
By Admin | Updated: January 8, 2015 00:57 IST2015-01-08T00:53:03+5:302015-01-08T00:57:46+5:30
कळंब : आर्थिक वर्ष संपल्यानंतरही आर्थिक पत्रके व अनुवंषिक माहिती निबंधक कार्यालयात सादर करणे बंधनकारक असताना, विवरणपत्रे संकेतस्थळावर भरणे आवश्यक असताना

४२ संस्था अवसायनात !
कळंब : आर्थिक वर्ष संपल्यानंतरही आर्थिक पत्रके व अनुवंषिक माहिती निबंधक कार्यालयात सादर करणे बंधनकारक असताना, विवरणपत्रे संकेतस्थळावर भरणे आवश्यक असताना संस्था अवसायानात का काढण्यात येऊ नये, यासंदर्भात काढलेल्या नोटिसांचा खुलासा न केल्याने संबंधित सहकारी संस्थाचे कामकाज बंद अथवा ठप्प असल्याचे गृहित धरून कळंब तालुक्यातील विविध प्रवर्गात नोंदविल्या गेलेल्या ४२ सहकारी संस्था अवसायानात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ कागदी अस्तित्व असणाऱ्या या संस्थावर सहायक निबंधक (सहकारी संस्था) कळंब यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
तालुक्यामध्ये सहकारी संस्थांची संख्या तब्बल ३५९ इतकी आहे. ग्रामीण भागात चांगलीच बळकट झालेली ही सहकार चळवळ अलिकडील काळात चांगलीच मोडकळीस आली आहे. काही संस्था वगळता अनेक संस्था केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. या संस्थांचे प्रतिनिधीत्व करूनच अनेकांनी जिल्हा स्तरावरील महत्वाच्या संस्थेत स्थान मिळविले आहे. अशा कागदी अस्तित्व असलेल्या सहकारी संस्थांची झाडाझडती घेण्यास सहायक निबंधक (सहकारी संस्था) कळंब या कार्यालयाने सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे केवळ कागदोपत्री चालविण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)४
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १०२ (२) (क) मधील तरतुदीनुसार सहायक निबंधकांना कामकाज बंद असलेल्या, कामकाज ठप्प असलेल्या, उपविधीतील तरतुदीनुसार कामकाजाची माहिती न पुरविणाऱ्या सहकारी संस्थांना अवसायानात काढण्यासंदर्भात नोटीसी बजावण्याचा, यावर खुलाशाअंती किंवा खुलासा न आल्यास अवसायानात काढण्याचा अंतिम आदेश काढण्याचा अधिकार आहे. यानुसार कळंबच्या सहायक निबंधक सी. पी. बनसोडे यांनी ३ जानेवारी रोजी तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अवसायानात काढण्याचा अंतिम आदेश काढला असून या संस्थावर अवसायकांची नेमणूक केली आहे.
स्वयंरोजगार सहकारी संस्था : धनेश्वर (कळंब), प्रगती (कळंब), सिताई (देवळाली), राणाजगजितसिंह (गंभीरवाडी), सावली (मोहा), पद्मसिंह (लोहटा पं.), तुळजा भवानी (हासेगाव के.), कै. संजय (डिकसळ), विकास (कळंब), विजय (कळंब), श्रीगणेश (कळंब), क्रांतीज्योत (खामसवाडी), स्वामी विवेकानंद (मस्सा), भविष्यवेध (कळंब), शिवधर्मवीर संभाजी (मंगरूळ), शिवरत्न (मस्सा), येडेश्वरी (लोहटा पू.), माऊली तारतांत्रिक (शेलगाव ज.), दिक्षा (लोहटा प.), शिवतीर्थ (शेळका धानोरा), परमेश्वर (कन्हेरवाडी), कै. शाम केरकर अॅप्रटिस (कळंब), साई वीज (कळंब), ताई (भोसा), श्रमशक्ती (कळंब), राजमाता जिजाऊ (ईटकूर), मातोश्री (आंदोरा), मेसाई (बाभळगाव), युवाशक्ती (कळंब), समीर (चोराखळी), जनहित (येरमाळा), येडेश्वरी (येरमाळा), अविनाश जाधवर (रत्नापूर). पाणी वाटप सहकारी संस्था : कुलस्वामिनी (वडगाव शि.), बळीराजा (ईटकूर), बालाजी (ईटकूर), दत्त (आंदोरा), सुदर्शन (गंभीरवाडी). इतर संस्था : किसान विकास व कृषी वस्तू व्यवसायिक (डिकसळ), पद्मसिंह कृषी विकास (लोहटा प.), येडेश्वरी कृषी व्यवसायिक व वस्तू (कळंब).