शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

'अभ्यासक्रम ४० टक्के ऑनलाईन, तर ६० टक्के ऑफलाईन'; संमिश्र शिक्षण पद्धत राबविण्याचा ‘यूजीसी’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:57 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.

ठळक मुद्देग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा जास्त धोका

औरंगाबाद : उच्च शिक्षणामध्ये यापुढील काळात विद्यापीठे व महाविद्यालयांनी ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन, तर ६० टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने शिकविण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असून विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. या संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईन व फेस टू फेस अध्यापन पद्धत राबविण्याची तरतूद करण्यात आली. ही तरतूद शिक्षकांना संभ्रमात टाकणारी आहे, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, या पद्धतीनुसार शिक्षकांनी दोन दिवस घरी बसून आणि चार दिवस कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचे का, हे स्पष्ट होत नाही. आम्ही ऑनलाईन तासिका घेतो तेव्हा बहुतांशी विद्यार्थी या तासिकांमध्ये सहभागी होत नाहीत. ऑनलाईन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यास संधी आहे. त्यामुळे हे धोरण प्रभावी ठरणारे नाही. दुसरीकडे, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांनी मात्र, या धोरणामुळे सर्वांना शिक्षण मिळेल. शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. अभ्यासक्रम, प्रात्याक्षिके व परीक्षा ऑनलाईन घेतल्यास कोणी कोठूनही परीक्षा देऊ शकेल व शिक्षणही घेऊ शकेल.

दुसरीकडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी मात्र ‘यूजीसी’चे हे धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मारक ठरेल, अशी भूमिका मांडली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या तेव्हा ८० टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला पसंती दर्शवली. या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा मानला आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे आधुनिक साधनांची वाणवा आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन व परीक्षेपासून वंचित राहतील. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हे धोरण उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

विद्यार्थी संघटना काय म्हणतात...‘यूजीसी’ने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना वर्गात बसून शिकता येईल. दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कधी संपुष्टात येईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे ४० टक्के ऑनलाइन व ६० टक्के ऑफलाइन पद्धतीनेच शिकवले गेले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.- निकेतन कोठारी, अभाविप

गुरुकुल शिक्षण पद्धतीला संपविण्याचा प्रयत्नप्रत्येकाला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही. या शिक्षण पद्धतीमुळे आपल्याकडील प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य देशात ऑनलाइन शिक्षण पद्धती प्रभावी ठरली आहे. कारण, त्यांना तिकडे तेवढी साधने उपलब्ध आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे आपल्याकडील गरीब, वंचित विद्यार्थ्यांच्या हातून शिक्षण हिसकावून घेण्यासारखे आहे.- प्रकाश इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद