कोरोनाबाधित ४ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळीची संख्या ४३५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:06 IST2020-07-25T15:03:23+5:302020-07-25T15:06:43+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत.

कोरोनाबाधित ४ रुग्णांचा मृत्यू; एकूण कोरोना बळीची संख्या ४३५
औरंगाबाद : घाटीत उपचार सुरू असताना औरंगाबादेतील ३ रुग्णांसह जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४३५ झाली आहे.
कोरोनामुळे जिल्हात दररोज रुग्णांचा मृत्यू होणे सुरूच आहे. शनिवारी कृष्णानगर येथील ५० वर्षीय पुरुष, संघर्षनगर-मुकुंदवाडी येथील ८८ वर्षीय पुरुष, जालाननगर येथील ७५ वर्षीय पुरुष आणि मालसोंदेव (जालना) येथील २५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.
आज ४० रुग्णांची वाढ
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागांतील १८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार ७५३ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३५ जणांचा मृत्यू झालेला आहे. आजघडीला ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत.