३७ हजारांची देशी दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:46 IST2019-04-21T21:46:46+5:302019-04-21T21:46:57+5:30
कोम्बिंग आॅपरेशन मोहिमअंतर्गत शनिवार रात्री ३७ हजाराची देशी दारु पकडली.

३७ हजारांची देशी दारु पकडली
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन मोहिमअंतर्गत शनिवार रात्री ३७ हजाराची देशी दारु पकडली.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी वाळूज एमआयडीसी हद्दीत छापा मारला. तेथे विनापरवाना देशी दारुचा साठा आढळून आला. यावेळी पोलिस पथकाने बबलू तुकाराम काळे यास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून ३७ हजार ४४० रुपये किमंतीचे १५ देशी दारुचे बॉक्स जप्त केले आहे.