३६८ स्त्रोत केले अधिग्रहित
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:51:27+5:302014-06-14T01:19:29+5:30
बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून होत असलेल्या अल्प पावसांमुळे अनेक वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे़
३६८ स्त्रोत केले अधिग्रहित
बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून होत असलेल्या अल्प पावसांमुळे अनेक वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे़ प्रशासनाने जिल्ह्यात २५७ बोअर तर १११ विहीरी अधिग्रहित केलेल्या आहेत़ तरी देखील काही गावांत व वाड्या, वस्त्यांवर पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे़
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १४५ गावे तर २१२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे़ पावसाळा सुरू झाला असला तरी गुरूवारपर्यंत मोठा पाऊस झालेला नसल्याचे पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळते़ ज्या गावातून पाणी टंचाई असल्याचा अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे़
त्या गावांमध्ये शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलेला आहे़ काही ठिकाणी विहीर अथवा बोअर अधिग्रहित केलेले आहे़ मात्र अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना व जनावरांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळते़ (प्रतिनिधी)
बोअर, विहीर अधिग्रहणाचा तपशील
तालुकाविहीरबोअर
बीड१२१४
गेवराई३०३५
वडवणी०९२१
शिरूर०९०९
पाटोदा१६१४
आष्टी०५१३
अंबाजोगाई१४५०
केज०५८५
परळी०३०६
धारूर०५१५
माजलगाव०५०९