३५ कर्मचाऱ्यांची पुन्हा दांडी

By Admin | Updated: July 29, 2014 01:10 IST2014-07-28T23:59:13+5:302014-07-29T01:10:18+5:30

जालना : शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी सोमवारी सकाळी विविध प्रभागांची पाहणी केली असता, ३५ स्वच्छता कर्मचारी गैरहजर आढळून आले.

35 workers reshuffed sugarcane | ३५ कर्मचाऱ्यांची पुन्हा दांडी

३५ कर्मचाऱ्यांची पुन्हा दांडी

जालना : शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी सोमवारी सकाळी विविध प्रभागांची पाहणी केली असता, ३५ स्वच्छता कर्मचारी गैरहजर आढळून आले.
शहरात आठ दिवसाचा मोठ्या प्रमाणात कचरा साचला. नाल्या तुंबून अस्वच्छता पसरली. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे. शहरात ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांना राहणे जिकिरीचे बनले आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील सर्वच प्रभागांची वाईट अवस्था आहे. कर्मचारी नियमित सफाई करीत नसल्याचे समस्या तीव्र बनली आहे. नगर पालिकेच्या वतीने शहरात खाजगी कंत्राटदारांमार्फत झोन पद्धतीने स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली. नगराध्यक्षा रत्नपारखे यांनी कामांची अचानक पहाणी केली. या पाहणी दरम्यान चार झोनमधील ३५ कर्मचारी गैरहजर आढळून आले.
या सर्व कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला देऊन यापुढे कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी जुना जालना भागातील ईदगाहची पाहणी करुन ईदनिमित्त स्वच्छतेसह अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे प्रशासकीय अधिकारी केशव कानपुडे, स्वच्छता निरीक्षक देवानंद पाटील, पंडित पवार, अशोक लोंढे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
स्वच्छता विभागाचा वचक नाही
नगर पालिकेच्या वतीने शहरात खाजगी कंत्राटदारांमार्फत झोन पद्धतीने स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली. नगराध्यक्षा रत्नपारखे यांनी कामांची अचानक पाहणी केली. या पाहणी दरम्यान चार झोनमधील ३५ कर्मचारी गैरहजर आढळून आले.

Web Title: 35 workers reshuffed sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.