चालकाच्या प्रसंगावधानाने एस.टी.चे ३५ प्रवासी बचावले
By Admin | Updated: November 25, 2014 01:01 IST2014-11-25T00:54:29+5:302014-11-25T01:01:23+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद- राजूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचे अचानक स्टेअरिंग फ्री झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वा. फुलंब्रीजवळ घडली.

चालकाच्या प्रसंगावधानाने एस.टी.चे ३५ प्रवासी बचावले
औरंगाबाद : औरंगाबाद- राजूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचे अचानक स्टेअरिंग फ्री झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वा. फुलंब्रीजवळ घडली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे बसमधील ३५ प्रवासी बालंबाल बचावले.
विजय कांबळे असे एसटी बसचालकाचे नाव आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या डेपोची बस सोमवारी सकाळी राजूरला जात होती. यावेळी बसमध्ये जवळपास ३५ प्रवासी होते. राजूर, फुलंब्री, हसनाबाद इ. ठिकाणी जाणारे हे बहुतांश प्रवासी होते. फुलंब्रीजवळ असलेल्या शासकीय रुग्णालयाजवळ बस असताना अचानक बिघाडामुळे स्टेअरिंग फ्री झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी बस वेगात होती; परंतु चालक विजय कांबळे यांनी प्रसंगावधान राखत गाडीचे वेळीच हँडब्रेक लावले. त्यामुळे गाडी जागेवरच थांबली.