शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

३२०० लाभार्थी निवडणार

By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST

नांदेड: विशेष घटक योजनेतंर्गत नवीन विहीर व इतर बाब घटकांच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांकडून २०१४-१५ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

३२०० लाभार्थी निवडणारनांदेड: विशेष घटक योजनेतंर्गत नवीन विहीर व इतर बाब घटकांच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांकडून २०१४-१५ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी जिल्ह्यातून ३२०० लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एम. टी. गोंडेस्वार यांनी दिली.तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर आधारित लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. तालुकानिहाय उद्दिष्ट असे-नांदेड २२८, मुदखेड ७६, अर्धापूर १०४, बिलोली २७०, धर्माबाद १२१, नायगाव ३०२, मुखेड ४१४, कंधार ३१९, लोहा २५६, हदगाव २३५, हिमायतनगर ७३, भोकर १४६, उमरी १२३, देगलूर ३४३, किनवट १३१ तर माहूर तालुक्याला ५९ लाभार्थी असे एकूण जिल्ह्यातून ३२०० लाभार्थ्यांच्या निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.नवीन विहीर व इतर बाब घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयास २० जुलै २०१४ पर्यंत पाठवायचे आहेत. प्रस्तावासोबत संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी दिलेले सन २०१३-१४ या वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, लाभधारकाचा शेतीचा चालू वर्षाचा सातबारा व होल्डिंग उतारा जमिनीचा टोच नकाशा, सन २००२ च्या सर्वेक्षणानुसार दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट असल्याबाबत संबंधित लाभार्थ्यांचे दारिद्र्य रेषेचा यादी क्रमांक उल्लेख असलेले गटविकास अधिकारी यांचे मूळ प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत, ग्रामसभेचा निवड करण्याबाबतचा ठराव देणे आवश्यक आहे.वार्षिक उत्पन्न ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे, दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही. परंतु लाभधारकांस १ मे २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे. (प्रतिनिधी)