दोन दिवसांत पकडल्या ३१८ वीजचोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:27 IST2019-06-04T23:27:03+5:302019-06-04T23:27:38+5:30

महावितरणने औरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

318 power stations in two days | दोन दिवसांत पकडल्या ३१८ वीजचोऱ्या

दोन दिवसांत पकडल्या ३१८ वीजचोऱ्या

ठळक मुद्देमहावितरण : ७ जूनपर्यंत चालणार मोहीम


औरंगाबाद : महावितरणनेऔरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढलेली आहे. अशावेळी आकडे टाकून किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करतात. या सगळ्यातून वीजचोरीमुळे विद्युत यंत्रणेवर ताण येऊन रोहित्रे नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबरोबरच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी तात्पुरता खंडित केलेला आहे, असे ग्राहकही चोरून वीज वापरण्याची शक्यता असते. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांत विशेष पथके नेमून २ ते ७ जूनदरम्यान वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व अभियंते-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या मोहिमेत २ व ३ जून या दोनच दिवसांत वीजचोरीची ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
मीटरमध्ये छेडछाड, आकडे टाकले
औरंगाबाद शहर मंडळात ३१, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १४६, तर जालना मंडळात वीजचोरीची १४१ प्रकरणे उघडकीस आली. ३१८ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची १८ प्रकरणे उघडकीस आली, तर मीटरमध्ये छेडछाड, आकडा टाकून थेट वीजचोरी केल्याची ३०० प्रकरणे आहेत.

Web Title: 318 power stations in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.