शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड पुन्हा अटकेत, नव्याने दाखल १५ कोटींच्या गुन्ह्यात ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:25 IST

२०२१ मध्ये समोर आलेल्या या घोटाळ्याने राज्याला हादरवून सोडले होते. तेव्हा ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कृष्णाला अटक झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या ३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाइंड कृष्णा एकनाथ राठोडला शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले. नोव्हेंबर महिन्यात त्याच्यावर नव्याने दाखल झालेल्या १५.४७ कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

प्रमोद जाधव (रा. बंजारा कॉलनी) यांच्या १.९५ कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारीवरून दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात राठोडविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोषसह राजेंद्र उर्फ पंकज प्रल्हाद जाधव (रा. गोलवाडी), सुहास पंडित चव्हाण (रा. बंजारा कॉलनी) आणि अमोल कृष्णा चव्हाण (रा. नाईकनगर) यांनी गुंतवणुकीवर १५ टक्क्यांच्या परताव्याचे आमिष दाखविले. त्यामुळे प्रमोद यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी ५० लाख, त्यांचे चुलत भाऊ राजेंद्र जाधव यांनी एक कोटी ४५ लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना परतावा मिळाला नाही. २०२१ मध्ये समोर आलेल्या या घोटाळ्याने राज्याला हादरवून सोडले होते. तेव्हा ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कृष्णाला अटक झाली होती.

नंतर नेमके काय झाले?दि. १६ नोव्हेंबरला २०२१ ला बिडकीन ठाण्यात ज्योती ढोबळे या महिलेच्या तक्रारीवरून पहिला गुन्हा दाखल झाला. त्यात अटकेनंतर कृष्णासह अन्य ६ आरोपींवर ५०० पानांचे दोषारोपपत्रही दाखल केले होते. त्यात हा घोटाळा ६८ कोटींचा असल्याचे म्हटले होते. कालांतराने कृष्णाला जामीन मंजूर झाला.

एमपीआयडी कायद्यासह गुन्हा दाखलनोव्हेंबर महिन्यात शहरात गुन्हा दाखल होताना कृष्णावर एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा नव्यानेच तपास होणार असल्याने प्रमोद यांच्यानंतर जवळपास ५४ तक्रारदारांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. त्यामुळे हा आकडा सध्या १५ कोटींपर्यंत पोहोचला आहे. सोमवारी उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, अंमलदार सखाराम मोरे, प्रभाकर राऊत, संदीप जाधव यांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दि. १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी